Supreme Court hearing : सत्तासंघर्षावरील सुनावणी आता १४ मार्चला; शिंदे गटाच्यावतीने वेळेवर ज्येष्ठ वकील मैदानात

Shivsena News : आता पुढील सुनावणी १४ मार्चला होणार आहे
Eknath Shinde Vs Uddhav Thackeray
Eknath Shinde Vs Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Supreme Court hearing : राज्याच्या सत्तासंघर्षावरील सर्वोच्च न्यायालयातील (Supreme Court) सुनावणीचा म्हणजेच दोन्ही गटांच्या युक्तिवादाचा आज अखेरचा दिवस होता. मात्र, आज सुनावणी पूर्ण झाली नाही. त्यामुळे आता पुढील सुनावणी १४ मार्चला होणार आहे. होळीच्या सुट्टीनंतर पुन्हा न्यायालयामध्ये युक्तीवाद होणार आहे.

आज शिंदे गटाचे वकील निरश किशन कौल यांनी युक्तीवाद केला. त्यानंतर ज्येष्ठ वकील हरीश साळवे यांनी युक्तीवाद केला. साळवे युक्तीवाद करताना म्हणाले, राजकीय नैतिकता टिकून रहावी, यासाठी न्यायालयाने हस्तक्षेप करण्याची मागणी कपिल सिब्बलल यांनी केली आहे. मी याच मुद्यावर प्रथम युक्तिवाद करणार.

Eknath Shinde Vs Uddhav Thackeray
Kasba By-Election Result: कसब्यात तीन दशकांनंतर इतिहास घडला; पोटनिवडणुकीतच भाजपचा गड खालसा

उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर राज्यपालांनी बहुमत चाचणीचे आदेश दिले होते. मात्र, ठाकरे बहुमत चाचणीला सामोरे गेले नाही. त्यामुळे कोणी कोणाला पाठिंबा दिला किंवा कोण कोणाच्या बाजूने होते, हे कसे कळेल, असा सवाल त्यांनी केला. याआधारे आमदारांच्या अपात्रतेवर न्यायालय निर्णय कसे काय घेऊ शकेल. तसेच, महाविकास आघाडीमधील एक घटक म्हणत असेल की आम्ही सरकारला पाठिंबा देणार नाही, अशावेळी त्यांची भूमिका योग्य की अयोग्य हे वकील कसे काय ठरवू शकतात.

सत्तासंघर्षाचे प्रकरण म्हणजे राजकारण. आघाडीमधील एका पक्षाला सरकारला पाठिंबा द्यायचा नसेल तर. ठाकरे बहुमत चाचणीला गेले असते तर शिंदे गटाने काय भूमिका घेतली असती हे आपण सांगू शकत नाही. तसेच, जेव्हा शिंदे बहुमत चाचणीला सामोरे गेले, त्यावेळी आघाडी सरकारचे समर्थक असलेले 13 आमदार गैरहजर राहिले.

राजकारण गतीने घडत असते. वेगवेगळ्या वेळी राजकीय पक्षांची भूमिका वेगवेगळी असू शकते. ती मान्य करायला पाहिजे. कोणाच्या बाजूने किती आमदार आहे आहेत, याची गणती करणे हे विधानसभा अध्यक्ष व राज्यपालांचे काम नाही. सर्वोच न्यायालयाने ते काम करावे, असे ठाकरे गटाचे म्हणणे आहे. राज्यपाल जे करू शकत नाही, ते न्यायव्यवस्थेला करायला सांगितले जात आहे. यापेक्षा धोकादायक काहीच असू शकत नाही.

Eknath Shinde Vs Uddhav Thackeray
Supreme Court News : सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय : केंद्रीय निवडणूक आयुक्तांची निवड होणार समितीद्वारे; केंद्राला धक्का

दहाव्या सुचीत दुरुस्तीसारख्या अनेक बाबी आहे. शिंदे गटाच्या 36 आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्याचे अधिकार विधानसभा अध्यक्षांचे आहेत. त्याला नंतर न्यायालयात आव्हान दिले जाऊ शकते, असा युक्तीवाद साळवे यांनी केला. त्यांचा युक्तीवाद पूर्ण झाला नाही. ते पुन्हा १४ मार्चला युक्तीवाद करणार आहेत. त्यानंतर ठाकरे गटाच्या वतीने कपील सिब्बल युक्तीवाद करणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com