Naveen Shekharappa
Naveen Shekharappa Sarkarnama
देश

बारावीला ९७ टक्के गुण मिळाले तरी युक्रेनला जावं लागलं! नवीनच्या वडिलांचा आक्रोश

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : रशियाने (Russia) युक्रेनमधील खारकीव शहरात केलेल्या बॉम्बहल्ल्यात मंगळवारी नवीन शेखरप्पा (Naveen Shekharappa) या वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. यावरून सोशल मीडियात अनेकानी युक्रेनमध्ये शिक्षण घ्यायला जाणाऱ्या विद्यार्थ्यांनाच दोष देण्यास सुरूवात केली आहे. पण प्रत्यक्षात नवीनच्या वडिलांनी युक्रेनला जाण्याचे कारण सांगत या नेटकऱ्यांना चांगलंच सुनावलं आहे.

नवीन शेखरप्पा हा बावीस वर्षांचा होता. युक्रेनमधील (Ukraine) खारकीव्ह या शहरात तो वैद्यकीय पदवीचे चौथ्या वर्षाचे शिक्षण घेत होता. कर्नाटकमधील हावेली याठिकाणी त्याचे कुटुंबीय राहतात. मुलाच्या मृत्यूची माहिती मिळताच कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. रशियाच्या बॉम्बहल्ल्याचा नवीन बळी ठरला आहे. नवीन हा एका सुपर मार्केटमध्ये काही वस्तू खरेदी करण्यासाठी गेला होता. यावेळी सुपर मार्केटबाहेर रांग लागली होती. नवीन रांगेत उभा असतानाच जवळच झालेल्या बॉम्बहल्ल्यात नवीनचा मृत्यू झाला. (Russia Ukraine War)

माध्यमांशी बोलताना नवीनच्या वडिलांच्या देशातील शिक्षण व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. नवीनला बारावीमध्ये ९७ टक्के गुण मिळाले होते. पण त्याला भारतात वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश मिळू शकला नाही. वैद्यकीयमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करावे लागतात. तर विदेशात त्याहून कमी खर्चात परदेशात भारतीय विद्यार्थी तेच शिक्षण घेऊ शकतात, अशी व्यथा नवीनच्या वडिलांनी सांगितली.

आम्ही नवीनला शिक्षणासाठी युक्रेनला पाठवलं होतं. पण आता तो कधीच परत येणार नाही, अशी भावना नवीनच्या वडिलांनी व्यक्त केली. नवीन हा सुरूवातीपासूनच हुशार होता. पण इथे प्रवेशासाठी एवढे पैसे नसल्याने त्याला युक्रेनला पाठवावं लागलं, असं नवीनच्या नातेवाईकांनी सांगितले. नवीनचे वडील मेकॅनिकल इंजिनिअर असून निवृत्तीनंतर शेती करत आहेत. तर आई गृहिणी आहे.

भारताने आतापर्यंत आठ विमानांमधून जवळपास दीड हजार नागरिकांना मायदेशी परत आणले आहे. तसेच जवळपास आठ हजारांहून अधिक भारतीयांना युक्रेन सोडलं आहे. अजूनही अनेक भारतीय युक्रेनमध्ये अडकले आहेत. त्यांनी सुरक्षित शहरांमध्ये जाण्याचे आवाहन यापूर्वीच दुतावासाकडून करण्यात आले आहे. दोन दिवसांपूर्वीच युक्रेन सरकारने पश्चिम भागात जाण्यासाठी विशेष रेल्वेगाड्या सुरू केल्या आहेत. पण आता दुतावासाच्या आवाहनामुळे भारतीयांनाही या युध्दाचा धोका वाढल्याचे संकेत मिळत आहेत.

रेल्वे स्थानकांवर भारतीय विद्यार्थी अडकून पडले आहेत. रेल्वेगाड्यांमध्ये स्थानिकांना प्रवेश दिला जात आहे. पोलिसांकडून विद्यार्थ्यांची अडवणूक केली जात असल्याच्या अनेक तक्रारी आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना युक्रेनच्या सीमेपर्यंत पोहचणे कठीण झाले आहे. विद्यार्थ्यांजवळील खाण्या-पिण्याचे साहित्यही संपत आले आहे. त्यामुळे अनेकांना उपाशी राहावे लागत असल्याचे अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT