नवी दिल्ली : हनुमाल चालीसा (Hanumal Chalisa) म्हटल्याने किंवा तसे जाहीर केल्याने नव्हे तर शिवसेनेच्या (ShivSena) गुंडांमुळे २३ एप्रिलला मुंबईतील कायदा सुव्यवस्था बिघडली, असा हल्लाबोल अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी केला. संसदेच्या विशेषाधिकार समितीसमोर आपण आपल्याला दिलेल्या वागणुकीची सविस्तर माहिती दिली, असून ही समितीच आपल्याला न्याय देईल असे त्यांनी सांगितले. (Navneet Rana Latest News in Marathi)
नवनीत राणा यांनी आज संसदीय समितीसमोर आपली आज बाजू मांडली. बैठकीनंतर त्या म्हणाल्या की आपल्याला मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) जी वागणूक दिली, जबरदस्तीने गाडीत बसविण्यात आले, जातीवाचक शब्द वापरले गेले. लॉकअपमध्ये आपल्याबरोबर जो गैरर्व्यवहार करण्यात आला त्या सर्वाची माहिती समितीला दिली आहे. २३ एप्रिलला मातोश्री निवासस्थानाबाहेर हनुमान चालीसा म्हणण्याचा इशारा दिल्यावर खासदार राणा व आमदार रवी राणा यांना मुंबई पोलिसांनी अटक केली होती.
५ मे रोजी विशेष न्यायालयाने त्यांना सशर्त जामीन मंजूर केला. मुंबई पोलिसांनी आपल्याबरोबर गैरव्यवहार व शिवीगाळ केल्याचा पुनरूच्चार करुण खासदार राणा म्हणाल्या की ''संसदीय समिती मुंबई पोलिसांच्या वरिष्ठांनाही बोलावेल. त्यांना समितीसमोर यावेच लागेल. मी माझी व्यथा संसदेच्या विशेषाधिकार समितीसमोर मांडली. त्यांच्याकडून आपल्याला न्याय मिळेल. कारण मुंबईत त्या दिवशी आमच्यामुळे नव्हे तर शिवसेनेच्या गुंडांमुळे वातावरण बिघडले होते. हनुमान चालीसा किंवा एखादे धार्मिक स्त्रोत्र म्हटल्याने देशद्रोहाचा गुन्हा कसा दाखल होऊ शकतो? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.'' त्यांना बोलताना अश्रू अनावर झाल्याची माहिती समितीच्या सूत्रांनी दिली.
दरम्यान, राणा दाम्पत्य भाजपच्या (BJP) इशाऱ्यावर महाराष्ट्र सरकारविरूध्द आंदोलन करत असल्याचा आरोप खासदार राणा यांनी फेटाळला. त्या म्हणाल्या की भाजप हा देशाच्या व जगाच्याही पातळीवर मजबूत स्थितीत पोचलेला पक्ष आहे. त्यांना कोणाला इशारे देऊन कामे करवून घेण्याची गरज नाही. मुळात हनुमान चालीसा म्हटल्याने कायदा सुव्यवस्था परिस्थिती बिघडत नाही. आपण आपले म्हणणे समितीसमोर सविस्तरणे मांडले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.