जेजुरी गडाचे सौंदर्य बहरणार; विकास आराखड्याला राज्य सरकारची मंजुरी

जेजुरी (Jejuri) गडाचे सौंदर्य वाढणार आराखड्याला राज्य सरकारची मंजुरी
Uddhav Thackeray, Supriya Sule
Uddhav Thackeray, Supriya Sulesarkarnama
Published on
Updated on

बारामती : अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरी (Jejuri) तीर्थक्षेत्राचे जतन आणि संवर्धन विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज मान्यता दिली. या विकास आराखड्या अंतर्गत मंदिराच्या संकुलाचे संवर्धन, परिसराचा विकास. येणाऱ्या भाविकासाठी सोयीसुविधा, जेजुरी आणि आसपासच्या ऐतिहासिक वारसा स्थळाचे जतन आणि संवर्धन करण्यात येणार आहे.

Uddhav Thackeray, Supriya Sule
महाआघाडी आणि अमोल कोल्हेंमुळे बैलगाडा शर्यती सुरू झाल्या : सुप्रिया सुळे

यासंदर्भात झालेल्या बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण , नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule), पुरंदरचे आमदार संजय जगताप हे उपस्थित होते. पहिल्या टप्प्यात सुमारे एकशे दहा कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे.

Uddhav Thackeray, Supriya Sule
राजगड कारखाना दलबदलू नेत्यांच्या पुनर्वसनाचा अड्डा नव्हे : भाजप पदाधिकाऱ्याने डागली तोफ!

या विकास आराखड्या अंतर्गत जेजुरी तीर्थत्रेत्राच्या परिसराचा विकास होणार आहे. मात्र, त्याच बरोबर यामध्ये गडाची ही डागडुजी होणार असल्याने जेजुरी गडाच्या सौंदर्यात वाढ होणार आहे. मंदिराचे काम, पूर्व आणि उत्तर पायरी मार्ग, दीप माळी, कमाण यांची पूर्ण डाकडूजी करण्यात येणार आहे. या कामासाठी राज्य सरकारच्या वतीने पहिल्या टप्प्यात ११० कोटी रुपयाच्या खर्चाला मान्यता दिली आहे, अशी माहिती देवस्थानचे विश्वस्त संदीप जगताप यांनी दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com