Punjab News, 09 Dec : पंजाब काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष तथा माजी क्रिकेटपटू नवज्योत सिंह सिद्धू यांच्या पत्नी काँग्रेस नेत्या नवज्योत कौर सिद्धू यांनी दोन दिवसांपूर्वी काँग्रेस पक्षा संदर्भात एक खळबळजनक दावा केल्याने नव्या वादाला तोंड फुटलं आहे.
पंजाब 'काँग्रेसमध्ये काँग्रेसमध्ये मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीसाठी 500 कोटी रुपयांची गरज असते' तिकीटासाठी कोट्यवधींची डील केली जाते, असं वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यामुळे भाजपने काँग्रेसवर जोरदार टीका करायला सुरूवात केली आहे..
या सर्व घडामोडीनंतर आता काँग्रेस पक्षाने नवज्योत कौर सिद्धू यांच्यावर मोठी कारवाई करत त्यांचं तडकाफडकी निलंबन केलं आहे. पंजाब काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमरिंदर सिंग राजा यांनी नवज्योत कौर सिद्धू यांना तात्काळ पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वातून निलंबित केल्याची माहिती दिली. त्यामुळे मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीसाठी 500 कोटी लागतात हे वक्तव्य नवज्योत कौर सिद्धू यांना चांगलंच भोवल्याचं दिसत आहे.
रविवारी (ता.7) माध्यमांशी संवाद साधताना त्या म्हणाल्या, 'काँग्रेसने पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी नवज्योत सिंह सिद्धू यांना मुख्यमंत्रिपदाचा चेहरा घोषित केलं तर ते सक्रीय राजकारणात परतकील. आम्ही नेहमीच पंजाब व पंजाबी लोकांबंद्दल, इथल्या संस्कृतीबद्दल बोलत असतो, परंतु, मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर बसण्यासाठी आमच्याकडे 500 कोटी नाहीत.'
नवज्योत कौर सिद्धू यांच्या या वक्तव्यावर काँग्रेसचे काँग्रेस खासदार तथा माजी उपमुख्यमंत्री सुखजिंदरसिंग रंधावा यांनी आक्षेप घेतला. ते म्हणाले, नवज्योत कौर यांचे पती माजी प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंह सिद्धू हे स्वतःच पक्ष देशोधडीला लावण्याचा प्रयत्न करत असून आता त्यांना नवज्योत कौरही मदत करत आहेत.
दरम्यान, नवज्योत कौर सिद्धू यांनी आपल्या वक्तव्याचा विपर्यास केला असून याचा मला धक्का बसल्याच म्हटलं आहे. काँग्रेसने आमच्याकडे कधीही काहीही मागितलं नाही. पण जेव्हा मला नवज्योत सिंह सिद्धू इतर कोणत्याही पक्षातून मुख्यमंत्रिपदाचा चेहरा बनू शकतात का? विचारलं तेव्हा मी आमच्याकडे मुख्यमंत्रिपदासाठी कोणालाही देण्यासाठी पैसे नाहीत, असं म्हटलं, असं स्पष्टीकरण नवज्योत कौर यांनी दिलं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.