Santosh Bangar: ना खेद, ना खंत, गुन्हा दाखल झाला तरी आमदार बांगर म्हणतात, 'मी काही चुकीचे केले नाही!

Santosh Bangare Election Rules Breach: संतोष बांगर यांच्या नगरपालिका निवडणुकीतील मतदान केंद्रावरील वर्तनामुळे राज्यभरात नाचक्की झाली. मतदान केंद्रावरील गोपनीयतेचा भंग करत मतदार महिलेला तिकडचे बटनही दाबा, असे सांगतानाचा बांगर यांचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला होता.
MLA Santosh Bangar
MLA Santosh BangarSarkarnama
Published on
Updated on

Shivsena News : शिवसेनेचे वादग्रस्त आमदार संतोष बांगर यांच्यावर कळमनुरीतील एका मतदान केंद्रात गोपनियतेचा भंग केल्या प्रकरणी गुन्हा नोंद झाला आहे. मतदान करणाऱ्या महिलेला मतदान कसे करायचे हे बांगर यांनी ईव्हीएम मशीनकडे जात सांगितले होते.

एवढेच नाही तर मतदान केंद्रात मोबाईल नेण्यास बंदी असताना स्वतः मतदान केल्यानंतर फोटो काढला, घोषणाही दिल्या. यावरून बांगर यांच्यावर टीकेची झोड उठली. मात्र याचा कुठलाही पश्चाताप किंवा खंत बांगर यांना नसल्याचे दिसून आले.नागपूरमध्ये माध्यमांनी या विषयावर छेडले असता आपण काही चुकीचे केले नसल्याचे बांगर म्हणाले.

कळमनुरीचे शिवसेना आमदार संतोष बांगर यांच्या नगरपालिका निवडणुकीतील मतदान केंद्रावरील वर्तनामुळे राज्यभरात नाचक्की झाली. मतदान केंद्रावरील गोपनीयतेचा भंग करत मतदार महिलेला तिकडचे बटनही दाबा, असे सांगतानाचा बांगर यांचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला होता. एवढेच नाही तर स्वतः बांगर यांनी मोबाईल वापरला मतदान केंद्रांत बंदी असताना तो सोबत नेला, स्वतः मतदान करतानाचे छायाचित्र काढले, बाळासाहेब ठाकरेंचा विजय असो, एकनाथ शिंदेंचा विजय असो तसेच शिवसेना पक्षाच्या घोषणाही दिल्या.

या प्रकारानंतर निवडणुक निर्णय अधिकाऱ्यांनी चौकशी करत आमदार संतोष बांगर यांच्याविरोधात तक्रार दिली. त्यानूसार बांगर यांच्यावर गुन्हा नोंद झाला. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही ' किमान लोकप्रतिनिधींनी लोकशाहीची चाड ठेवली पाहिजे, निवडणुकीत आपण कसे वागतोय, आपण कोणता संदेश देतोयं, याचा विचार केला पाहिजे' अशा शब्दांत बांगर यांना झापले होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही बांगर यांच्या या कृतीबद्दल नाराजी व्यक्त करत त्यांना खडेबोल सुनावले होते.

मात्र, आपण काही चुकीचे केले नाही,असे म्हणत आमदार संतोष बांगर यांनी आपण फक्त संबंधित महिलेला तिचे मतदान झाले की नाही? हे लक्षात येत नसल्याने ते झाले हे सांगितले, असा दावा केला आहे. नागपूर हिवाळी अधिवेशनाला विधीमंडळ परिसरात माध्यमांनी जेव्हा संतोष बांगर यांना या प्रकाराबद्दल विचारले, तेव्हा त्यांनी आपण काही चुकीचचे केले नसल्याचे म्हटले आहे. बांगर यांच्यावर निवडणुक गोपनियतेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. या शिवाय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या हिंगोली जिल्हाप्रमुख संदेश देशमुख यांनी तर बांगर यांची आमदारकी रद्द करा, अशी मागणी निवडणुक आयोगाकडे केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com