Punjab News : पंजाब काँग्रेसचे माजी अध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू हे उद्या (दि.१ एप्रिल) तुरुंगाबाहेर येणार आहेत. 'रोड रेज' प्रकरणी त्यांना एक वर्षाच्या कारावासाची शिक्षा झाली होती.
पटियाला तुरुंगात ते शिक्षा भोगत होते. मात्र, त्यांना उद्या शनिवारी तुरुंगातून मुक्त करण्यात येणार आहे. याबाबतची माहिती सिद्धू यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून देण्यात आली आहे.
नवज्योतसिंग सिद्धू हे शिक्षा पूर्ण होण्याच्या 48 दिवस आधीच तुरुंगाबाहेर येणार आहेत. त्यांनी आतापर्यंत 11 महिन्यांची शिक्षा भोगली आहे. या शिक्षेच्या काळात त्यांनी एकदाही पॅरोल सुट्टी घेतली नाही. त्यामुळे सिद्धू यांना काही दिवस आधीच तुरुंगातून मुक्त करण्यात येणार आहे.
दरम्यान, नवजोतसिंग सिद्धू हे 1 एप्रिलला तुरुंगाबाहेर बाहेर येणार आहेत. त्यामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे.
प्रकरण नेमकं काय?
27 डिसेंबर 1988 ला नवजोतसिंग सिद्धू यांचा कार पार्किंगवरून गुरनाम सिंह यांच्याशी वाद झाला होता. हे प्रकरण थेट हाणामारीपर्यंत पोहोचलं होतं. यामध्ये गुरनाम सिंह हे जखमी झाले होते. त्यानंतर गुरनाम सिंह यांचे निधन झाल्याचे वृत्त समोर आलं होतं.
या प्रकरणी सिद्धू यांना ट्रायल कोर्टाने निर्दोष मुक्त केलं होतं. मात्र, हायकोर्टाने त्यांना 3 वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर त्यांनी या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. यावेळी पुनर्विलोकन याचिकेवरील सुनावणी दरम्यान सिद्धू यांना एक वर्ष तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.