Ajit Pawar, Uaddhav Thackeray, Pruthviraj Chavan
Ajit Pawar, Uaddhav Thackeray, Pruthviraj Chavan Sarkarnama

Girish Mahajan Statement : 'मविआ' च्या सभेबाबत गिरीश महाजनांचं मोठं विधान

Chhatrapati Sambhajinagar : महाविकास आघाडीच्या सभेला परवानगी मिळणार की नाही? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
Published on

Chhatrapati Sambhajinagar News:  महाविकास आघाडीकडून २ एप्रिलला छत्रपती संभाजीनगरमध्ये सभेचं आयोजन करण्यात आले आहे. मात्र, रामनवमीच्या आधीच्या रात्री (दि.29 मार्च) संभाजीनगरमध्ये झालेल्या तुफान राडा, दगडफेक आणि वाहन जाळपोळीच्या घटनेनंतर छत्रपती संभाजानगर शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

त्यांमुळे आता या सभेला परवानगी मिळेल की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे २ एप्रिल होणाऱ्याला महाविकास आघाडीच्या सभेला परवानगी मिळणार की नाही ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. यातच भाजपा नेते गिरीश महाजन यांनी केलेल्या एका विधानामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

Ajit Pawar, Uaddhav Thackeray, Pruthviraj Chavan
Praniti Shinde on BJP : अदानींच्या उद्योगात हजारो कोटींची गुंतवणूक केलेला चिनी कोण? काँग्रेसने केला थेट सवाल

छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या दंगलीनंतर आता सभा होणार का? असा प्रश्न गिरीश महाजन यांना विचारला. “मविआच्या सभेमुळे वातावरण बिघडत असेल, तर सभा थांबवू. पोलिसांनी काही रिपोर्ट दिल्यास किंवा सभेमुळे काही प्रश्न निर्माण होणार असतील तर प्रशासन परवानगी देणार नाही,” असं गिरीश महाजन म्हणाले आहेत.

Ajit Pawar, Uaddhav Thackeray, Pruthviraj Chavan
Delhi Politics: केजरीवालांना गुजरात न्यायालयाचा झटका; 25 हजारांचा ठोठावला दंड, 'हे' आहे कारण

शिंदे-फडणवीस सरकारच्या विरोधात महाविकास आघाडीकडून राज्यभरात सभा घेतल्या जाणार आहे. त्यातील ही पहिलीच सभा आहे. गिरीश महाजन यांच्या विधानानंतर आता महाविकास आघाडीचे नेते काय प्रतिक्रिया देणार, याकडे लक्ष लागलेलं आहे. मविआच्या प्रमुख नेत्यांमध्ये या संदर्भात चर्चा होणार आहे.

दरम्यान, गिरीश महाजन यांच्या विधानावर अजित पवार यांनी उत्तर दिले आहे. ते म्हणाले, "महाविकास आघाडीची सभा आहे. आमची दोन ताखरेची सभा आधीच ठरली होती. जे लोक माझ्या संपर्कात आहे. तिथे असा कोणताही निर्णय झालेला नाही. पोलिस यंत्रणांनी या सर्व गोष्टी कंट्रोलमध्ये आणून आणि कायदा सुव्यवस्था राखून परिस्थिती पूर्ववत करावी, अशी विनंती मी तेथील पोलिसांना केली आहे. एकटा अजित पवार या बाबत निर्णय घेत नाही इतर नेते देखील निर्णय घेतात. मी काही बोललो तर ब्रेकिंग न्युज तयार होईल कारण तिथे सगळे नेते तयारी करत आहेत. ठरलेले कार्यक्रम व्हायलां पाहिजे असं मला वाटतं."

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com