Nawab Malik Sarkarnama
देश

Nawab Malik Bail : नवाब मलिकांना सर्वोच्च दिलासा; जामिनास मुदतवाढ, न्यायालयात नेमके काय झाले?

Supreme Court : वैद्यकीय रिपोर्टनुसार सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

Sunil Balasaheb Dhumal

Delhi Political News : राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना आरोग्याच्या कारणास्तव दोन महिन्यांसाठी जामीन मंजूर करण्यात आला होता. या काळात मलिकांची प्रकृती ठीक झाली नाही. उपचारांसाठी त्यांना आणखी काही दिवस लागणार आहेत. या वैद्यकीय कारणास्तव सर्वोच्च न्यायालयाने मलिकांना मोठा दिलासा दिला आहे. न्यायालयाने मलिकांच्या जामिनाला आता तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. (Latest Political News)

मनीलाँड्रिंगप्रकरणी मलिकांना अटक करण्यात आली होती. प्रकृती अस्वास्थ्याच्या कारणास्तव दीड वर्षानंतर ऑगस्ट २०२३ मध्ये मलिकांना दोन महिन्यांसाठी जामीन मंजूर करण्यात आला होता. या काळात (Nawab Malik) नवाब मलिकांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही.

याबाबत कोर्टापुढे ताजे रिपोर्ट सादर करण्यात आले. तसेच त्यांना अंतरिम जमीन देण्यात यावा, असा युक्तिवाद मलिकांच्या वलिकांनी केला. मलिकांची किडनी अजूनही योग्य पद्धतीने काम करत नाही. वैद्यकीय कारण लक्षात घेता कोर्टाने त्यांना तीन महिने जामीन वाढवून दिल्याचे वकिलांनी सांगितले. (Maharashtra Political News)

दरम्यान, मलिकांना अटक झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठी फूट पडली. सध्या अनेक मातब्बर नेत्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. कुणी राष्ट्रवादीत राहण्याचा निर्णय घेतला तर कुणी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) गटाला पाठिंबा दिला आहे.

शरद पवारांचे विश्वासू समजले जाणारे नवाब मलिक जामीन मंजूर झाल्यानंतर कुणाला साथ देणार याकडे लक्ष लागले होते. मात्र, दोन महिन्यांत त्यांनी आपली राजकीय भूमिका स्पष्ट केलेली नाही. अद्यापही त्यांच्या प्रकृतीत योग्य ती सुधारणा झाली नसल्याने जामीन वाढवला आहे. या कार्यकाळात ते आपली भूमिका जाहीर करण्याची शक्यता आहे.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT