Supriya Sule On BJP Offer : राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळे यांनी आज एक नवा गौप्यस्फोट केला आहे. भाजप आज जर आमच्यावर 'नॅचरल करप्ट पार्टी' असा आरोप करत होती, तर आमच्यासोबत मागील दाराने चर्चा का करत होती? भाजपने राष्ट्रवादीला ऑफर का दिली होती? असा थेट सवाल करत सुळे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. (Latest Marathi News)
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, "भाजपला मला एक प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही राष्ट्रवादीला नॅचरल करप्ट पार्टी म्हणत होता. एकीकडे छगन भुजबळ म्हणतात की, सातत्याने भाजप आणि राष्ट्रवादीची चर्चा होत होती. एकीकडे भ्रष्टाचाराचे आरोप करून 'ना खाऊंगा ना खाने दूंगा' म्हणणारा भाजप आमच्याबरोबर चर्चा करायला का बसला? भुजबळांच्या म्हणण्यानुसार भाजपनेच राष्ट्रवादीला ऑफर दिली होती. याचाच अर्थ भाजपने आमच्यावर खोटे आरोप केले. यामुळे भाजपने राष्ट्रवादीची माफी मागितली पाहिजे."
सुळे म्हणाल्या, "शरद पवारांनी ज्यावेळी राजीनामा दिला. त्यांना तो द्यायचाच नव्हता; पण या सगळ्यांचा जो भाजपसोबत जाण्याचा आग्रह होता, त्यामुळे ते दुखावले गेले. आणि तो राजीनामा दिला, खरंतर त्यांची राजीनामा द्यायची अजिबात इच्छा नव्हती. तुम्हाला ते नाट्य वाटत असेल, आमच्यासाठी ते वास्तव होतं."
(Edited by - Chetan Zadpe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.