Naxalite attack at Dantewada at 6th April 2010
Naxalite attack at Dantewada at 6th April 2010 Sarkarnama
देश

Naxalite attack at Dantewada: दंतेवाड्यातील विचित्र योगायोग; १२ वर्षांपुर्वी एप्रिल महिन्यातच झाला होता हल्ला

सरकारनामा ब्युरो

Naxalite attack at Dantewada : छत्तीसगडमधील दंतेवाडा येथे नक्षलवाद्यांनी मोठा हल्ला (Naxalite attack) केला. नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या आयडीच्या स्फोटात 10 जवान शहीद झाले असून एका नागरिकाचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. दंतेवाडाच्या अरनपूरमध्ये झालेल्या आत्मघातकी स्फोटात जवान शहीद झाले. पण या घटनेने पुन्हा एकदा 6 एप्रिल 2010 मध्ये झालेल्या नक्षलवादी हल्ल्याच्या दु:खद आठवणी जाग्या झाल्या आहेत. 6 एप्रिल 2010 रोजी दंतेवाडात झालेल्या नक्षलवादी हल्ल्यात 76 जवानांनी आपले प्राण गमावले होते. (Strange coincidence in Dantewada; The attack took place 12 years ago in the month of April)

- काय घडलं होतं 6 एप्रिल 2010 रोजी?

6 एप्रिल 2010 रोजी तीन दिवसांची मोहिम पुर्ण करुन सीआरपीएफ आणि स्थानिक पोलिसांसह सुमारे 80 जवान परतत होते. त्याचवेळी नक्षलवाद्यांनी नियोजन पुर्वक जवानांच्या ताफ्यावर हल्ला केला होता. नक्षलवाद्यांना सीआरपीएफचा ताफा या मार्गाने जाणार असल्याची पुर्ण माहिती होती. याच संधीचा फायदा घेत त्यांनी जवानांच्या ताफ्यावर हल्ला चढवला. ज्या मार्गाने सीआरपीएफचा ताफा जाणार होता त्या भागात जवळपास एक हजार नक्षलवादी दबा धरुन बसले होते. नक्षलवाद्यांनी एवढ्या नियोजनाने आणि वेगाने हल्ला केला की जवानांना प्रत्युत्तर देण्याची संधीही मिळाली नाही. (Crime news)

- हल्ल्याच्या चौकशी अहवालात अनेक त्रुटी

त्यानंतर या हल्ल्यासंदर्भात चौकशी करण्यात आली. चौकशी अहवालातून जवानांच्या सुरक्षेतील अनेक त्रुटी समोर आल्या होत्या. जवानांचा ताफा येत असताना रस्ते तपासण्यासारख्या अनेक मार्गदर्शक नियमांचे पालन केले नसल्याचे आढळून आले. तसेच,सैनिकांकडे पुरेशी शस्त्रे नसल्याचंही या अहवालात नमुद करण्यात आलं होतं. (CRPF)

- पी. चिदंबरम यांची राजीनाम्याची तयारी दर्शवली होती

2010 च्या पीटीआय अहवालानुसार 7 एप्रिल रोजी तत्कालीन गृहसचिव जी.के. पिल्लई यांनीही त्यात अनेक चुका झाल्याचे मान्य केलं होतं. काही चुका नक्कीच झाल्या.दंतेवाडात झालेल्या हल्ल्यानंतर गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी राजीनामा देण्याची तयारी दर्शवली होती.दंतेवाड्यात जे घडले त्याची संपूर्ण जबाबदारी मी घेऊन राजीनामा देतो, असे चिदंबरम म्हणाले होते.मात्र पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी ती फेटाळून लावली.

याआधी कितीवेळा नक्षलवादी हल्ले झाले आहेत?

6 एप्रिल 2010 रोजी छत्तीसगडमधील दंतेवाडा येथे नक्षलवादी हल्ला झाला, ज्यात 76 जवान शहीद झाले.

25 मे 2013 रोजी काँग्रेसच्या परिवर्तन यात्रेवर झिरम खोऱ्यात हल्ला झाला होता. त्यात काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांसह 30 हून अधिक लोक मारले गेले होते.

11 मार्च 2014 रोजी सुकमा जिल्ह्यातील तहकवाडा येथे नक्षलवादी हल्ला झाला होता. यामध्ये 15 जवान शहीद झाले.

12 एप्रिल 2014 रोजी छत्तीसगडमधील बस्तर जिल्ह्यातील दरभा येथे नक्षलवादी हल्ला झाला होता. यामध्ये पाच जवानांसह 14 जणांचा मृत्यू झाला होता.

11 मार्च 2017 रोजी सुकमाच्या दुर्गम भेज्जी भागात नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात 12 CRPF जवान शहीद झाले होते.

24 एप्रिल 2017 रोजी सुकमा येथे माओवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (CRPF) 25 जवान शहीद झाले होते.

21 मार्च 2020 रोजी सुकमा जिल्ह्यातील मिनपा येथे जवानांवर नक्षलवादी हल्ला झाला, ज्यामध्ये 17 जवान शहीद झाले.

23 मार्च 2021 रोजी छत्तीसगडमधील नारायणपूर जिल्ह्यात सैनिकांनी भरलेल्या बसवर हल्ला झाला होता, ज्यामध्ये 5 जवान शहीद झाले होते.

4 एप्रिल 2021 रोजी छत्तीसगडमधील विजापूर आणि सुकमा जिल्ह्यांच्या सीमेवर नक्षलवादी हल्ला झाला, ज्यामध्ये 22 जवान शहीद झाले.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT