Devendra Fadanvis on Prakashsingh Badal: प्रकाशसिंग बादलांना श्रद्धांजली वाहताना फडणवीसांना आठवण झाली, त्यांच्या 'जज्बा' आणि 'तजुर्ब्या'ची!

Parkash Singh Badal News | पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांचे मंगळवारी (ता. २५) रात्री साडेआठच्या सुमारास निधन झाले.
Devendra Fadanvis on Prakashsingh Badal:
Devendra Fadanvis on Prakashsingh Badal:Sarkarnama
Published on
Updated on

Devendra Fadanvis share menories of Prakashsingh Badal: पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल (Parkash Singh Badal)  यांचे मंगळवारी (ता. २५) रात्री साडेआठच्या सुमारास निधन झाले. प्रकृती खालावल्याने त्यांना शुक्रवारी सकाळी मोहालीतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. (While paying tribute to Prakash Singh Badal, Fadnavis remembered his 'passion' and 'experience'!)

प्रकाशसिंग बादल यांना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis news) यांनीही श्रद्धांजली वाहिली आहे. देवेंद्र फडणवीसांनी ट्विट करत प्रकाशसिंग बादल यांची आठवणही शेअर केली आहे. आठ वर्षांपुर्वी 2015 मध्ये पुण्यात प्रकाश सिंह बादल साहेबांना ‘संत नामदेव राष्ट्रीय पुरस्कार‘ प्रदान करण्याची संधी मला मिळाली होती, अशी आठवण त्यांनी शेअर केली आहे. याच वेळी त्यांनी या कार्यक्रमातील प्रकाश सिंग बादल यांच्या सोबतचा फोटोही शेअर केला आहे.

Devendra Fadanvis on Prakashsingh Badal:
Eknath Shinde News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ‘यासाठी’ आज नागपुरात येणार?

''सन 2015 मध्ये पुणे येथे श्री प्रकाश सिंह बादल साहेबांना ‘संत नामदेव राष्ट्रीय पुरस्कार‘ प्रदान करण्याची संधी मला मिळाली होती. त्यावर्षी मी देशाचा सर्वात तरुण मुख्यमंत्री होतो तर श्री बादल साहेब हे देशातील सर्वात ज्येष्ठ मुख्यमंत्री! "भारताच्या राजकारणातले पांडवांच्या बाजूने असणारे भीष्म पितामह,” या शब्दात मी साहेबांचा उल्लेख केला तेव्हा त्यांनी स्मितहास्य करून दाद दिली होती. (Panjab Political news)

भारतीय राजकारणातील भीष्म पितामह असलेल्या बादल साहेबांना पंजाबच्या जनतेने सन 1957 पासून 10 वेळा विधानसभेत निवडून दिले. 5 वेळा त्यांनी पंजाबचे मुख्यमंत्री पद सांभाळले. माझ्या सारख्या तरुण मुख्यमंत्र्याच्या हस्ते सन्मान स्वीकारल्यानंतरच्या जाहीर मनोगतामध्ये त्यांनी मोठा कानमंत्रच दिला होता. ते म्हणाले होते, “राजनीति में अकेले जवानी से काम नहीं चलता; जज्बा चाहिए, तजुर्बा भी चाहिए!” 'जज्बा' आणि 'तजुर्बा' राखून असलेला नेता आज स्वर्गवासी झाल्याने भारतीय लोकशाहीचे अपरिमित नुकसान झाले आहे. श्री बादल साहेबांना माझी विनम्र श्रद्धांजली.'' अशी ट्विट करत त्यांनी प्रकाश सिंग बादल यांची आठवण शेअर केली आहे.

कोण होते प्रकाश सिंग बादल?

प्रकाशसिंग बादल यांनी 1947 मध्ये राजकारणाला सुरुवात केली. त्यांनी सरपंचाची निवडणूक लढवली आणि जिंकली. त्यानंतर ते सर्वात तरुण सरपंच झाले. 1957 मध्ये त्यांनी पहिली विधानसभा निवडणूक लढवली. 1969 मध्ये त्यांनी पुन्हा विजय मिळवला. 1969-70 पर्यंत ते पंचायत राज, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय इत्यादी मंत्रालयांचे मंत्री होते. याशिवाय ते 1970-71, 1977-80, 1997-2002 मध्ये पंजाबचे मुख्यमंत्री झाले. 1972, 1980 आणि 2002 मध्ये ते विरोधी पक्षनेतेही झाले. मोरारजी देसाई पंतप्रधान असताना ते खासदार म्हणून निवडून आले होते. 2022 ची पंजाब विधानसभा निवडणूक लढवल्यानंतर ते सर्वात वयस्कर उमेदवार देखील ठरले.

Edited By- Anuradha Dhawade

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com