NCP Sharad Pawar Latest Marathi News, Presidential election 2022 news Sarkarnama
देश

राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवणार का? शरद पवारांनी आपल्या सहकाऱ्यांना सांगितलं...

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत 18 जुलै रोजी मतदान होणार आहे.

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विरोधी पक्षांचे उमेदवार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नावाची चर्चा असल्याचे बोलले जात आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही पवारांच्या नावाला पसंती दिली आहे. तसेच आम आदमी पक्षाही पवारांच्या नावाबाबत सकारात्मक असल्याचे संकेत मिळत आहेत. या चर्चेबाबत आता खुद्द शरद पवारांनीच आपली भूमिका स्पष्ट केली आहे. (Sharad Pawar Latest Marathi News)

मुंबईत सोमवारी झालेल्या राष्ट्रवादीच्या बैठकीत पवार यांनी ही शक्यता फेटाळून लावली आहे. आपण विरोधी पक्षांचे उमेदवार असणार नाही, असं त्यांनी या बैठकीत स्पष्ट केल्याचे वृत्त टाईम्स ऑफ इंडियाने दिले आहे. मी या शर्यतीत नाही. राष्ट्रपतीपदासाठी मी विरोधकांचा उमेदवार नाही, असं पवार म्हणाल्याचे या वृत्तात नमूद करण्यात आले आहे.

गुलाम नबी आझाद यांना पसंती

काँग्रेसचे नेते गुलाम नबी आझाद यांचं नाव पुढं येऊ शकतं, अशी चर्चा आहे. इतर पक्षांकडूनही त्यांच्या नावावर सहमती होऊ शकते. भाजपकडून सर्व पक्षांच्या संमतीने उमेदवार देण्याच्या हालचाली सुरू आहेत. पण विरोधकांकडून स्वतंत्र उमेदवार देण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी 15 जून रोजी दिल्लीत विरोधकांची बैठक बोलावली आहे. या बैठकीला राष्ट्रवादीसह शिवसेनेचे नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे. शरद पवार यांच्याकडून विरोधकांची एकजूट करून तगडा उमेदवार देण्यासाठी प्रयत्न केले जाऊ शकतात, अशीही राजकीय वर्तुर्ळात चर्चा आहे.

काय म्हणाले होते नाना पटोले?

महाराष्ट्रातील व्यक्ती जर देशाचे राष्ट्रपती होत असतील आणि त्यासाठी शरद पवार यांचे नाव पुढे आले तर महाराष्ट्र काँग्रेस त्यांच्याबरोबर असेल, असं पटोले म्हणाले होते. तर युपीएमध्ये आपचा सहभाग नसला तरी पवारांचे नाव पुढे आल्यास त्याला पाठिंबा दिला जाऊ शकतो, असे आपमधील सुत्रांनी सांगितल्याचे वृत्त 'इंडिया टू़डे'ने दिले दोन दिवसांपूर्वी दिले होते. आपचे खासदार संजय सिंग यांनी काही दिवसांपूर्वीच मुंबईतील त्यांच्या घरी भेट घेतली होती. राष्ट्रपती निवडणुकीबाबत दोघांमध्ये चर्चा झाल्याचेही वृत्तात नमूद करण्यात आले आहे.

राष्ट्रपती पदासाठी निवडणूक

नामांकन अर्ज दाखल करण्याची मुदत- 29 जून

नामांकन अर्जांची छाननी- 30 जून

नामांकन परत घेण्याची तारीख- 2 जुलै

मतदान- 18 जुलै

मतमोजणी- 21 जुलै

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT