राणेंच्या वळचणीला बसलेले पारकर आता उलट्या बोंबा का मारत आहेत? भाजप नेते संतापले

कोकणात मागील काही वर्षांपासून नारायण राणे विरूध्द असा संघर्ष सुरू आहे.
Shiv Sena, BJP Latest Marathi News, Rajya Sabha Election
Shiv Sena, BJP Latest Marathi News, Rajya Sabha Election Sarkarnama
Published on
Updated on

कणकवली : श्रीधर नाईक उद्यानाच्या उद्घाटनावरून पुन्हा एकदा राणे आणि शिवसेना संघर्ष पाहायला मिळत आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या हस्ते उद्यानाचे उद्घाटन करण्यास नगरसेवक कन्हैया पारकर यांनी विरोध केल्यानंतर भाजपनेही त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे. राणेंच्या वळचणीला बसलेले पारकर आता उलट्या बोंबा का मारत आहेत, असा सवाल भाजपचे नगरसेवक शिशिर परूळेकर यांनी केला आहे. (Narayan Rane Latest Marathi News)

राणे हे श्रीधर नाईक खून खटल्यात आरोपी होते. ते नंतर निर्दोष सुटले असले तरी त्यांच्या हस्ते उद्यानाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते केल्यास राजकीय दहशतवादाला खतपाणी घातल्यासारखे होईल, अशी टीका पारकर यांनी केली आहे. त्याला उत्तर देताना परूळेकर यांनी पारकरांवर जोरदार हल्ला चढवला.

Shiv Sena, BJP Latest Marathi News, Rajya Sabha Election
श्रीधर नाईक खून खटला राणेंच्या जुन्या सहकाऱ्यानेच उकरून काढला!

परूळेकर म्हणाले, राणे काँग्रेसमध्ये असताना लाल दिव्याच्या लालसेपोटी पारकर बंधू काँग्रेसमध्ये आले. राणेंकडे भीक मागून त्‍यांनी महामंडळावरही वर्णी लावून घेतली. तीन वर्षे राणेंसोबत राहून सत्ता उपभोगली. त्‍यावेळी पारकर बंधूंना राणेंचा दहशतवाद दिसला नाही का?

पारकर हे नेहमीच दहशतवादाच्या नावे ओरड करतात. पण त्यांना राणेंचा दहशतवाद टोचत होता तर त्‍यांनी महामंडळावर वर्णी लावण्यासाठी मुंबईतील राणेंच्या अधीश बंगल्‍याच्या पायऱ्या का झिजवल्‍या, असा सवाल परूळेकर यांनी केला. सत्तेच्या लाभासाठी एका पक्षातून दुसऱ्या पक्षात उड्या मारणाऱ्या पारकरांना नैतिकता शोभत नाही, अशी टीकाही परुळेकर यांनी केली.

Shiv Sena, BJP Latest Marathi News, Rajya Sabha Election
सदाभाऊ खोत यांची माघार; भाजपचे पाच उमेदवार विधान परिषदेच्या रिंगणात

उदय सामंत यांच्या हस्ते उद्घाटन

कणकवलीचा विकास करताना कोणताही श्रेयवाद करत नाही. त्‍यामुळे २२ जूनला होणाऱ्या श्रीधर नाईक उद्‌यान लोकार्पण कार्यक्रमाचे आमंत्रण पालकमंत्री उदय सामंत यांना दिले. एवढेच नव्हे तर त्‍यांच्याच प्रमुख उपस्थितीमध्ये उद्यानाचे उद्‌घाटन होणार आहे. केवळ राजकीय लाभासाठी पारकर बंधूंनी काँग्रेसमध्ये प्रवेश करून कणकवलीकरांचा विश्‍वासघात केला होता. त्यामुळे आता त्यांनी उद्यानाच्या उद्‌घाटन कार्यक्रमाला उपस्थित राहू नये, असं परूळेकर यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com