Sharad Pawar and Ajit Pawar Sarkarnama
देश

NCP Crisis : राष्ट्रवादीची आयोगातील आजची सुनावणी संपली; युक्तिवादादरम्यान जोरदार खडाजंगी

Sharad Pawar VS Ajit Pawar: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षचिन्हाबाबत आता पुढची सुनावणी 24 नोव्हेंबरला होणार

Ganesh Thombare

Delhi News: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पडलेल्या फुटीनंतर पक्ष आणि चिन्हाचा वाद निवडणूक आयोगात सुरू असून, राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचं म्हणणं निवडणूक आयोग ऐकून घेणार आहे. अजित पवार गटाने खोटी प्रतिज्ञापत्र दिल्याचा दावा करत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी शरद पवार गटाकडून करण्यात आली. या वेळी युक्तिवादादरम्यान दोन्ही गटांत जोरदार खडाजंगी झाली.,

सोमवारी झालेल्या सुनावणीत शरद पवारांच्या बाजूने वकील अभिषेक मनू सिंघवी आणि वकील देवदत्त कामत यांनी जोरदार युक्तिवाद केला, तर अजित पवार गटाचे वकील मुकुल रोहतगी यांनी अभिषेक मनू सिंगवी हे एका तासापासून फक्त एफिडेव्हिटबद्दल बोलत आहेत, त्यांच्याकडे बोलण्यासाठी काहीच नाही, असे म्हणत मुकुल रोहतगी यांनी त्यांचा मुद्दा खोडून काढला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

यानंतर शरद पवार गटाचे वकील देवदत्त कामत यांनी आयोगासमोर महत्त्वाचा मुद्दा मांडत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षपद हे शरद पवारांना देण्यात यावे, यासाठी अजित पवारांच्या वतीने प्रस्ताव दाखल करण्यात आला होता. त्या सोबतच त्या प्रस्तावावर अजित पवारांची स्वाक्षरी असून, गेल्या दहा महिन्यांपासून अजित पवार हे शांत होते. मात्र, त्यांना जेव्हा वेगळं व्हायचं होतं, तेव्हा त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला, असे देवदत्त कामत यांनी आयोगाला सांगितले.

तसेच अजित पवार गटाच्या वतीने केंद्रीय निवडणूक आयोगाला संभ्रमात ठेवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही देवदत्त कामत यांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्षपद आणि राष्ट्रीय अधिवेशन यासंदर्भात अजित पवार गटाच्या वतीने संभ्रम निर्माण केला जात असल्याचेही ते म्हणाले. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षचिन्हाबाबतची सुरू असलेली आजची सुनावणी संपली असून, पुढची सुनावणी आता 24 नोव्हेंबरला होणार आहे. त्यामुळे या सुनावणीत काय होतं, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

Edited by Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT