Sharad Pawar VS Ajit Pawar: राष्ट्रवादी कुणाची ? सुनावणी वेळी शरद पवारांच्या वकिलांचा आयोगात मोठा दावा

NCP Crisis and Election Commission : अजित पवार गटावर कायदेशीर कारवाई करावी, वकील अभिषेक मनू सिंघवी यांची मागणी
Sharad Pawar and Ajit Pawar
Sharad Pawar and Ajit Pawar Sarkarnama
Published on
Updated on

Delhi News: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पडलेल्या फुटीनंतर पक्ष-चिन्हाचा वाद निवडणूक आयोगात सुरू आहे. अजित पवार गटाकडून पक्ष आणि चिन्हावर दावा सांगण्यात आल्यानंतर राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांत कायदेशीर लढाई सुरू झाली. यानंतर निवडणूक आयोगासमोर आतापर्यंत तीन सुनावण्या झाल्या. या तीनही सुनावणीदरम्यान दोन्ही गटांकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आला.

आता पुढील तीन दिवस राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचं म्हणणं निवडणूक आयोग ऐकून घेणार आहे. त्यामुळे या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गेल्या सुनावणीत शरद पवार गटाकडून अजित पवार गटावर बोगस शपथपत्रकं दाखल करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Sharad Pawar and Ajit Pawar
NCP News : राष्ट्रवादी कुणाची आज सुनावणी; शरद पवार, अजित पवार उपस्थित राहणार ?

आता आज सुरू असलेल्या सुनावणीत शरद पवारांच्या वकिलांना निवडणूक आयोगाने विचारणा करत ज्या मुद्द्यांवर गेल्या सुनावणीत युक्तिवाद करण्यात आला, त्या मुद्द्यांचा पुन्हा उल्लेख न करण्यास सांगितले आहे, तर या वेळीही शरद पवारांच्या वकिलांनी निवडणूक आयोगासमोर मोठा दावा केला आहे.

राष्ट्रीय कार्यकारणीमधील पदाधिकाऱ्यांचे बोगस प्रतिज्ञापत्र अजित पवार गटाने आयोगासमोर सादर केले असून, केवळ कार्यकर्त्यांचेच नाही तर पदाधिकाऱ्यांचेही बोगस शपथपत्र सादर करण्यात आल्याचे वकील सिंघवी यांनी म्हटले. याबरोबरच अजित पवार गटाच्या वकिलांची केस डिसमिस करण्याची मागणी आयोगाकडे त्यांनी केली.

तसेच कुवर प्रताप सिंग हे राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सरचिटणीस आहेत आणि ते शरद पवार गटासोबत आहेत, असे असताना अजित पवार गटाने त्यांचे खोटे शपथपत्र आपल्या बाजूने सादर केले. एवढंच नाही तर सिंग यांची खोटी सही आणि शपथपत्र अजित पवार गटाने दिले, त्यामुळे अजित पवार गटावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी केली आहे.

दरम्यान, शरद पवारांचे वकील अभिषेक मनू सिंघवी हे उशिरा पोहोचल्यामुळे सुनावणीला उशिरा सुरुवात झाली. सध्या अभिषेक मनू सिंघवी युक्तिवाद करत आहेत, तर राष्ट्रवादीच्या या सुनावणीसाठी दोन्ही गटांकडून महत्त्वाचे नेते आयोगात दाखल आहेत. त्यामुळे आयोग काय निर्णय देतं, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

Edited by Ganesh Thombare

Sharad Pawar and Ajit Pawar
NCP Split News : मोठी बातमी : राष्ट्रवादी कुणाची ? अजितदादा गटाचे सगळे दावे फेटाळले ; शरद पवार गटाकडून उत्तर दाखल..

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com