Mumbra Conversion Case news  Sarkarnama
देश

Mumbra Conversion Case : राष्ट्रवादीनं मुख्यमंत्र्यांना पाठवली कायदेशीर नोटीस ; ..अन्यथा माफी मागा

NCP News : मुंब्रा धर्मांतर प्रकरणावरुन राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

सरकारनामा ब्यूरो

NCP News : उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये मोबाईलमधील ऑनलाईन गेमिंगद्वारे धर्मातर केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. महत्त्वाचं म्हणजे गाझियाबादमधल्या या धर्मांतराचं कनेक्शन महाराष्ट्रातील मुंब्र्याशी जोडण्यात येत आहे. मुंब्रा येथे 400 जणांचं धर्मांतर करण्यात आल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मुंब्रा धर्मांतर प्रकरणावरुन राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. मुंब्र्यात 400 सोडा, धर्मांतर झालेली चार नावं तरी दाखवा असं आव्हान त्यांनी उत्तर प्रदेशच्या पोलिसांना दिलं आहे.

या वादात आता राष्ट्रवादी काँग्रेसने उडी घेतली आहे. राज्य अल्पसंख्याक आयोगाचे माजी सदस्य, उत्तरप्रदेशातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सहसचिव सय्यद अली अश्रफ (Syed Ali Ashraf) उर्फ ​​भाईसाहब यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, पोलीस आयुक्त आणि गाझियाबादचे उपपोलीस आयुक्त निपुण अग्रवाल यांना कायदेशीर नोटीस पाठवली.

गाझियाबाद पोलिसांच्या डीसीपींनी काही दिवसांपूर्वी एक निवेदन दिले होते की, एका कॉलरने त्यांना गाझियाबादप्रमाणेच मुंब्रा येथे 300-400 लोक धर्मांतरित झाल्याची माहिती दिली होती. या कॉलरने धर्मांतराशी संबंधित काही फोटो, व्हिडिओ, ऑडिओ आणि मोबाइल क्रमांक पोलिसांना दिले आहेत. या माहितीची सत्यता पडताळली जात आहे. या पार्श्वभूमीवर मुंब्रा पोलीस पुरावे गोळा करण्यासाठी गाझियाबादला पोहोचले आहेत.

धर्मांतराचे (Conversion) आरोप सिद्ध करावे अन्यथा मुंब्रा येथील नागरिकांची माफी मागावी, अशी मागणी या नोटिशीमध्ये केली आहे. अश्रफ म्हणाले, ‘काही दिवसांपूर्वी गाझियाबादचे पोलीस उपायुक्त निपुण अग्रवाल यांनी दावा केला होता की, मुंब्रा येथे ऑनलाइन मोबाइल गेमद्वारे 400 लोकांचे धर्मांतर करण्यात आले.’

वृत्तवाहिन्यांवर चुकीची माहिती देऊन जाणिवपूर्वक बदनामी करणाऱ्या निपुण अदरवाल या उपायुक्ताने व्यक्तिश: वृत्तवाहिनीवर माफी मागावी, अशी कायदेशीर नोटिस पाठवण्यात आल्याची माहिती सय्यद अली अश्रफ यांनी दिली.

(Edited By : Mangesh Mahale)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT