Lok Sabha Elections 2024: बावनकुळेंनी लोकसभाप्रमुखांना दिलं टार्गेट; भाजपसोबत येणाऱ्या प्रत्येकाचे..

Chandrashekhar Bawankule News: जे आधी कधी पक्षावर किंवा स्थानिक नेत्यांवर नाराज होऊन दूर गेले असतील त्यांनाही जवळ करण्याची जबाबदारी या प्रमुखांवर टाकण्यात आली आहे.
Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar Bawankulesarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर भाजपने राज्यात ४८ लोकसभाप्रमुखांची नेमणूक केली आहे. आतापासूनच लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने तयारी सुरु केली आहे. त्यासाठी रणनीती ठरविण्यात आली आहे.

पहिल्या टप्यात लोकसभाप्रमुखांनी काय नियोजन करावे, याबाबतच्या सूचना देण्यात आल्या आहेत. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा,केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत लोकसभा प्रमुखांची लवकरच बैठक होणार आहे. या बैठकीत त्यांच्यावरील जबाबदारीबाबत सखोल चर्चा केली जाणार आहे.

Chandrashekhar Bawankule
Ashish Dedhmukh Join BJP : आशिष देशमुखांची भाजपमध्ये घरवापसी का झाली ? फडणवीसांनी सांगितले कारण...

पक्षश्रेष्ठींशी संवाद साधण्यासाठी एका अँपची निर्मिती करण्यात आली आहे. पहिल्या टप्यात निवडणूक जिंकण्यासाठी आवश्यक ती यंत्रणा उभी करण्याची जबाबदारी या लोकसभाप्रमुखांवर सोपविण्यात येणार असल्याचे समजते. यामध्ये एका बुथमध्ये २० प्रचारप्रमुख आणि ११ समित्याचे प्रमुख असतील. यांची नेमणूक करण्याची जबाबदारी या लोकसभाप्रमुखांची असेल.

लोकसभा निवडणुकीपर्यंत भाजपसोबत येऊ इच्छिणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला जोडून घेण्याचे आदेश केंद्रीय पातळीवरून आले आहेत. भाजपसोबत येणाऱ्या प्रत्येकाचे पक्षात स्वागतच केले जाईल. शिवाय जे आधी कधी पक्षावर किंवा स्थानिक नेत्यांवर नाराज होऊन दूर गेले असतील त्यांनाही जवळ करण्याची जबाबदारी या प्रमुखांवर टाकण्यात आली आहे.

Chandrashekhar Bawankule
Thackeray group : ठाकरेंना तीन धक्के ; शिवसेना वर्धापनदिन पूर्वसंध्येला शिंदे गटाची खेळी ?

"असे होणार नाही"

प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत नुकतीच लोकसभाप्रमुखांची बैठक झाली. भाजपत आलेल्या काही कार्यकर्त्यांबाबत एका प्रमुखांनी बावनकुळेकडे नाराजी व्यक्त केली, "पक्षात प्रवेश देण्यापूर्वी स्थानिकांना विश्वास घ्या," असे या प्रमुखाने बावनकुळेंना सांगितले. त्यावर "असे होणार नाही" असे बावनकुळेंनी स्पष्टपणे सांगितले.

"भाजपसोबत येणाऱ्या प्रत्येकाचे पक्षात स्वागतच केले जाईल. शिवाय जे आधी कधी पक्षावर किंवा स्थानिक नेत्यांवर नाराज होऊन दूर गेले असतील त्यांनाही जवळ करण्याची जबाबदारी प्रमुखांवर आहे, " असे बावनकुळेंनी सांगितले.

अधिकारांच्या मुद्द्यावरून संघर्ष..

पक्षातील आतापर्यंतच्या रचनेनुसार जिल्हाध्यक्ष आणि इतर पदाधिकाऱ्यांशी अधिकारांच्या मुद्द्यावरून संघर्ष होऊ शकतो, अशी शक्यता बावनकुळे यांनी घेतलेल्या बैठकीत काही लोकसभाप्रमुखांनी व्यक्त केली, अशीही माहिती समोर येते आहे. त्यामुळे जबाबदारी वाटण्यावरुन संघर्ष होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

लोकसभाप्रमुखांकडे अशी असेल जबाबदारी..

  • मतदार संघाच नियंत्रण कक्ष सुरु करणे

  • मतदारसंघात किमान ५०० सक्रिय कार्यकर्ते जोडण्याचे लक्ष्य

  • मित्रपक्षाच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी तेवढेच काम करणे अपेक्षित

  • आपल्याकडची माहिती ते थेट नेत्यांशी शेअर करू शकतील.

  • पुढच्या काळात पक्षप्रवेश वाढावेत यासाठी प्रयत्न

(Edited By : Mangesh Mahale)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com