लखनौ : उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकीचे (UP Election 2022) राजकारण चांगलंच तापलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही (NCP) या निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहे. समाजवादी पक्षासोबत (Samajwadi Paty) आघाडी केल्याची घोषणा पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी केली होती. यानंतर दुसऱ्याच दिवशी राष्ट्रवादीच्या उमेदवाराची घोषणा करण्यात आली होती. ही जागा समाजवादी पक्षाने काढून घेतल्याची चर्चा सुरू होती. यावर अखेर राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांनी खुलासा केला आहे.
राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सरचिटणीस के. के. शर्मा (K. K. Sharma) हे निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत. त्यांना अनूपशहर (Anupshahar) मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. समाजवादी पक्षाकडून त्यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे उत्तर प्रदेशचे प्रदेशाध्यक्ष उमाशंकर यादव यांनी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांच्याशी चर्चा केली होती. त्यानंतर के. के. शर्मा यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले होते.
आता राष्ट्रवादीला मिळालेली ही जागा काढून घेतल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली आहे. यावर प्रदेशाध्यक्ष उमाशंकर यादव यांनी म्हटले आहे की, सोशल मीडियात सुरू असलेली चर्चा खोटी आहे. आमची समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांच्यासोबत लखनौ येथे पुढील जागावाटपाबाबत चर्चा करण्यासाठी बैठक होणार आहे. या बैठकीला समाजवादी पक्षासोबत आघाडी करणारे पक्ष उपस्थित असणार आहेत. त्या सर्वच पक्षांचे नेते याठिकाणी उपस्थित असतील. या बैठकीत प्रामुख्याने इतर जागांबाबत अखिलेश यादव यांच्या सोबत चर्चा होणार आहे.
शर्मा यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आता राष्ट्रवादीला आणखी किती जागा मिळणार, याबाबत उत्सुकता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसप्रमाणे तृणमूल काँग्रेस व उत्तर प्रदेशातील इतर स्थानिक पक्षांनी समाजवादी पक्षाला साथ दिली आहे. या आघाडीमध्ये सुहेलदेव भारतीय समाज पार्टी, महान दल, राष्ट्रीय लोक दल, जनवादी पार्टी, प्रगतीशील समाजवादी पार्टी आणि अपना दल-कमेरावादी या पक्षांचा समावेश आहे. राष्ट्रवादीला नेमक्या किती जागा मिळतील, हे आजच्या बैठकीत स्पष्ट होईल.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसकडून उत्तर प्रदेशसह मणिपूर व गोव्यात विधानसभा निवडणूक लढवली जाणार आहे. गोव्यात काँग्रेस व तृणमूलसोबत आघाडीसाठी बोलणी सुरू आहेत. उत्तर प्रदेशमध्ये यावेळी परिवर्तन होणार असल्याचे शरद पवार यांनी मंगळवारी सांगितले. भाजपचे तेरा आमदार फुटणार असल्याचा गौप्यस्फोटही त्यांनी केला होता. त्यानुसार आतापर्यंत भाजपच्या पाच आमदारांनी राजीनामा दिला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.