Kerala Congress : काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवलेले काँग्रेस खासदार शशी थरूर हे सध्या केरळमधील विविध भागांचा दौरा करत आहेत. यादरम्यान ते समाज, राजकारण आणि इतर क्षेत्रांशी संबंधित लोकांना भेटत आहेत. अशातच शशी थरूर यांना पक्षांतर्गत विरोधालाही सामोरे जावे लागत आहे. केरळ काँग्रेस (Congress) अध्यक्षांसह पक्षाच्या अनेक नेत्यांनी त्यांच्या विरोधात भूमिका घेतली आहे. दुसरीकडे केरळ राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना खुली ऑफर दिली आहे.
पी.सी. चाको यांनी दिली ऑफर?
केरळ राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष पी.सी. चाको यांनी शशी थरुर यांना राष्ट्रवादी पक्षात येण्याची खुली ऑफर दिली आहे. ‘शशी थरूर यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये येण्याची इच्छा असेल तर आम्ही त्यांचे आनंदाने स्वागत करू. काँग्रेसने नाकारल्यानंतरही त्यांची तिरुअनंतपुरूम येथून खासदारकी कायम राहील. काँग्रेस त्यांच्याकडे दुर्लक्ष का करत आहे, हे मला समजत नाहीये,’ असे पीसी चाको म्हणाले.
पण चाको यांची ऑफर नंतर शशी थरूर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘मला राष्ट्रवादीत जायचे असल्यास स्वागताची गरज भासेल. मात्र मी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार नाही. पक्षप्रवेशाबाबत पीसी चाको यांच्याशी कोणताही चर्चा झाली नसल्याचे, शशी थरुर म्हटले आहे.
दरम्यान, केरळ काँग्रेसमधील एक गट शशी थरूर यांच्यावर नाराज असल्याचेही बोलले जात आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी थरूर मुख्यमंत्रीपदाची निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याने त्यांनी आतापासूनच त्यांच्या प्रतिमासंवर्धनाचे काम सुरु केले आहे, असे काँग्रेसमधील थरूर यांच्या विरोधकांचे म्हणणे आहे. यावरही त्यांनी स्पष्टीकरण दिले आहे. २०२६ मध्ये केरळमध्ये विधानसभेची निवडणूक होणार आहे. त्यामुळे मला घाबरण्याचे कारण नाही. मला केरळ काँग्रेसमध्ये कोणतेही गट पाडायचे नाहीत आणि तशी माझी इच्छाही नाही, असे थरूर यांनी स्पष्ट केलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.