बार्शीत दिव्यांगाची क्रूर थट्टा : निधीसाठी उपोषण करणाऱ्या १० वर्षीय मुलाचा मृत्यू; तीन महिन्यांपूर्वी बहिणीलाही गमावले

त्यानंतर निगरगठ्ठ प्रशासन खडबडून जागे झाले आणि बार्शीकडे धाव घेतली आहे.
Hunger Strike
Hunger StrikeSarkarnama

बार्शी (जि. सोलापूर) : सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील बार्शी (Barshi) तालुक्यात अत्यंत हृद्‌यद्रावक आणि प्रशासनाची चीड आणणारी घटना घडली आहे. ग्रामपंचायतीकडून दिव्यांगांना देण्यात येणारा निधी मिळत नसल्यामुळे बार्शी तालुक्यातील चिखर्डे येथील स्मशानभूमीत १५ नोव्हेंबरपासून कुरुले कुटुंबीय काही कार्यकर्त्यांसह उपोषणाला (strike) बसले होते. मात्र, उपोषणाला बसलेल्या १० वर्षीय दिव्यांग मुलाचा मृत्यू (Death) झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे तीन महिन्यांपूर्वीच कुरुले यांच्या मुलीचाही उपोषणादरम्यान मृत्यू झाला होता. (Death of 10-year-old boy who sat on hunger strike with family for disability fund in Barshi)

दरम्यान, संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल झाल्याशिवाय मुलावर अंत्यसंस्कार करणार नसल्याची भूमिका कुरुले कुटुंबाने घेतली आहे. त्यानंतर निगरगठ्ठ प्रशासन खडबडून जागे झाले आणि बार्शीकडे धाव घेतली आहे. प्रांतधिकारी व इतर अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. तसेच, आमदार बच्चू कडू यांनीही कुरुले यांची समजूत काढली आहे.

Hunger Strike
मला उमेदवारी द्यायची की नाही, हे भाजप ठरवेल : खासदार शृंगारेंचे विधान

संभव रामचंद्र कुरुले (वय १०) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. तीन महिन्यांपूर्वीच संभव याच्या बहिणीचा निधी मागणीसाठी करण्यात आलेल्या उपोषणादरम्यान मृत्यू झाला होता. आता तिच्या भावाचाही उपोषणात मृत्यू झाल्याने प्रशासनाविरुद्ध प्रचंड रोष निर्माण झाला आहे.

Hunger Strike
संभाजी ब्रिगेडची रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त नवी घोषणा : आरक्षणाकडून अर्थकारणाकडे...

दिव्यांगांना ग्रामपंचायतीकडून मिळणारा निधी देण्यात येत नसल्याने चिखर्डे येथील काही कार्यकर्त्यांनी उपोषण सुरू केले होते. रविवारी (ता.४) उपोषणादरम्यान अल्पवयीन दिव्यांग मुलाची प्रकृती खालावल्याने त्याला उपचारासाठी बार्शी येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचारापूर्वीच त्याला मृत घोषित केले. त्यानंतर कुटुंबाने संभवचा मृतदेह चिखर्डे येथे आपल्या घरी आणला..

Hunger Strike
शिंदे गटाच्या आमदारांचा जीव पुन्हा टांगणीला : मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त 'या' कारणांमुळे पुन्हा हुकणार?

चिखर्डे येथील रामचंद्र कुरुले यांची अल्पवयीन दिव्यांग मुलगी वैष्णवी कुरुळे हिचा २८ ऑगस्ट रोजी उपोषण सुरु असतानाच मृत्यू झाला होता. त्यावेळी प्रशासनाने पंधरा दिवसांत मुख्यमंत्री सहायता निधी, राजीव गांधी सहायता निधीतून मदत करु, असे आश्वासन दिले होते. मात्र, अद्याप कोणतीही मदत मिळाली नाही, असे उपोषणकर्त्यांनी सांगितले.

Hunger Strike
भाजपने वाढविले गवळी, बारणे, किर्तीकरांसह शिंदे गटाच्या पाच खासदारांचे टेन्शन

ग्रामपंचायत अपंग निधीतून मदत मिळावी म्हणून दिवाळीवेळी उपोषण सुरु केले होते. ग्रामपंचायतीसमोर उपोषण करण्यास परवानगी दिली नाही; म्हणून १५ नोव्हेंबरपासून चिखर्डे स्मशानभूमीत अमर पाटील, नंदकुमार गिरमकर, रामचंद्र कुरुळे, संभव कुरुळे, झानेश्वर बळी यांनी उपोषण सुरु केले होते. उपोषणाला पोलिस बंदोबस्त होता. दरम्यान, आज उपोषणावेळी संभव कुरुलेचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.

ग्रामपंचायत अपंग निधी मिळण्यासाठी आम्ही उपोषण सुरु केले होते. पण प्रशासनाने दुर्लक्ष केले. जबाबदार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा अथवा आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मृतदेह घेऊन जाणार असून तोपर्यंत अंत्यविधी करणार नाहीत, असे उपोषणकर्ते नंदकुमार गिरामकर यांनी सांगितले.

चिखर्डे येथील दिव्यांग मुलगा संभव कुरुळे याचा मृत्यू झाला आहे, खूप खंत आहे. आम्ही मुख्यमंत्री सहायता निधी व राजीव गांधी सहायता निधीतून आर्थिक मदत मिळण्यासाठी प्रस्ताव पाठवला आहे. याबाबत वरिष्ठ प्रशासनाला माहिती दिली आहे. हा विषय जिल्हा परिषद व पंचायत समिती संदर्भातील आहे, असे बार्शीचे तहसीलदार सुनील शेरखाने यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com