NDA Sarkarnama
देश

NDA Government : नरेंद्र मोदींना पाठिंबा दिलेल्या पक्षांना किती जागा? पाहा संपूर्ण यादी...

Lok Sabha Election 2024 Result Modi Government NDA : लोकसभा निवडणुकीत एनडीएला 292  मिळाल्या एकट्या भाजपचे संख्याबळ 240 एवढे आहे.

Rajanand More

New Delhi : ‘एनडीए’च्या बैठकीत नरेंद्र मोदींना पंतप्रधानपदासाठी सर्व मित्रपक्षांनी पाठिंबा दिला. एनडीएमध्ये एकूण 24 पक्ष असून त्यापैकी 21 पक्षांचे नेते बैठकीला हजर होते, अशी माहिती समोर आली आहे. मात्र, 21 पैकी केवळ 14 पक्षांचे खासदार निवडून आले आहेत.

पंतप्रधानपदी पुन्हा नरेंद्र मोदीच विराजमान होणार, हे जवळपास निश्चित झाले आहे. एनडीएकडून आजच सत्तास्थापनेचा दावा केला जाऊ शकतो. भाजपला बहुमतावर सत्ता स्थापन करता येणार नाही. त्यामुळे पंतप्रधान मोदींच्या तिसऱ्या टर्ममध्ये मित्रपक्षांना महत्व प्राप्त झाले आहे. मागील दोन्ही सरकारमध्ये भाजपला बहुमत मिळाले होते.

एनडीएच्या 292 जागांमध्ये भाजपला 240 जागा मिळाल्या आहेत. मात्र, 272 चा आकडा गाठण्यासाठी 32 जागा कमी पडल्या. मित्रपक्षांना मिळालेल्या जागांमुळे एनडीएल 292 चा आकडा गाठता आले. त्यामध्ये तेलगू देसम आणि संयुक्त जनता दलाची भागीदारी मोठी आहे.

तेलगू देसमला आंध्र प्रदेशात सर्वाधिक 16 जागा मिळाल्या आहेत. भाजपनंतर एनडीएमध्ये हाच सर्वात मोठा मित्रपक्ष ठरला आहे. टीडीपी नंतर नितीश कुमार यांच्या जेडीयूचे बिहारमध्ये 12 खासदार निवडून आले आहेत. त्यामुळे एनडीएमध्ये त्यांचेही वजन चांगलेच वाढले आहे.

टीडीपी आणि जेडीयू वगळता इतर कोणत्याही मित्रपक्षाला दोन आकडी खासदार मिळालेले नाहीत. या दोन पक्षानंतर सर्वाधिक सात जागा महाराष्ट्रात शिवसेनेला मिळाल्या आहेत. त्यानंतर चिराग पासवान यांच्या पक्षानेही बिहारमध्ये पाच जागा मिळवत एनडीएत महत्वाचं स्थान मिळवलं आहे.

एनडीएतील कोणत्या पक्षाला किती जागा?

भाजप – 240

टीडीपी - 16

जेडीयू - 12

शिवसेना - 7

लोक जनशक्ती पार्टी (रामविलास) – 5

जेडीएस - 2

राष्ट्रीय लोकदल - 2

जेएसपी - 2

एजीपी - 1

यूपीपीएल - 1

राष्ट्रवादी काँग्रेस - 1

हम (एस) - 1

एडीएएल – 1

एजेएसयूपी – 1

एकूण - 292

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT