NDA Government : ‘एनडीए’कडून आजच सत्तास्थापनेचा दावा? राष्ट्रपतींकडून मावळत्या कॅबिनेटला मेजवानी

Lok Sabha Election 2024 Result Modi Government NDA Vs India Alliance : लोकसभा निवडणुकीत एनडीएला 292 जागा तर इंडिया आघाडीला 234 जागा मिळाल्या आहेत.   
PM Narendra Modi, Droupadi Murmu
PM Narendra Modi, Droupadi MurmuSarkarnama
Published on
Updated on

New Delhi : सर्व मित्रपक्षांची बैठक घेत एनडीएने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे बुधवारीच (ता. 5) सत्तास्थापनेचा दावा करण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. त्यामुळे नितीश कुमार आणि चंद्राबाबूंना गळाला लावण्याचा प्रयत्न करणाऱ्या इंडिया आघाडीला एनडीएने शह दिला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत झालेल्या एनडीएच्या बैठकीला नितीश कुमार आणि चंद्राबाबूंसह जवळपास 15 पक्षांचे नेते उपस्थित होते. ही बैठक जवळपास तासभर चालली. या बैठकीत पंतप्रधानांनी सर्व नेत्यांशी संवाद साधत सत्तास्थापनेबाबत आश्वस्त केले.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासह एनडीएतील इतर पक्षांचे नेते बुधवारी रात्रीच राष्ट्रपतींना भेटून सत्तास्थानेचा दावा करू शकतात, अशी जोरदार चर्चा आहे. त्यानंतर गुरूवारी भाजपच्या संसदीय दलाच्या बैठकीत नरेंद्र मोदींची संसदीय दलाचा नेता म्हणून निवड केली जाईल आणि शनिवारी (ता. 8) नव्या सरकारचा शपथविधी होईल, अशीही चर्चा आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत लोकसभा विसर्जित करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली होती. त्यानंतर हा प्रस्ताव पंतप्रधान मोदींनी राष्ट्रपतींकडे सादर केला होता. राष्ट्रपतींंनी मोदींचा राजीनामा मंजूर करताना 17 वी लोकसभा विसर्जित केली.

PM Narendra Modi, Droupadi Murmu
Nitish Kumar-Chandrababu Naidu : दोन ‘बाबूं’पैकी एकाने साथ सोडली तरी मोदी सरकार ‘सेफ’; असा आहे नंबर गेम...

राष्ट्रपतींनी पंतप्रधानांचा राजीनामा मंजूर केल्यानंतर एनडीएची बैठक पार पडली. मंगळवारपासून चर्चेत असलेल्या नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांच्यासह इतर पक्षांनीहीएनडीएला समर्थनाचे पत्र दिल्याचे समजते. त्यामुळे एनडीएचा सत्तास्थापनेचा दावा मजबूत झाला आहे.

राष्ट्रपतींकडून डिनर

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज राष्ट्रपती भवनात मावळत्या मंत्रिमंडळासाठी मेजवानीचे आयोजन केले आहे. मावळत्या मंत्रिमंडळाला राष्ट्रपतींकडून 'डिनर' देण्याची परंपरा आहे. त्यानुसार बुधवारी रात्री आठ वाजता राष्ट्रपती भवनात या मेजवानीचे आयोजन केल्याचे समजते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com