Bengaluru News : आगामी विधान परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) नेत्यांची शनिवारी (ता. २६) बंगळूरमध्ये बैठक झाली. या बैठकीत निवडणूक रणनीती, आघाडीच्या उमेदवारांचा विजय आणि सत्ताधारी काँग्रेस सरकारच्या कारभाराविरोधात जनजागृती करण्याबाबत चर्चा करण्यात आली. आगामी निवडणुका एनडीएने गांभीर्याने घेतल्या असून, काँग्रेसला आव्हान देण्यासाठी आतापासूनच तयारी करण्यावर बैठकीत भर दिला.
या बैठकीला केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी, एच. डी. कुमारस्वामी, भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र, विधानसभेतील विरोधी पक्षनेते आर. अशोक आणि माजी मुख्यमंत्री आणि खासदार जगदीश शेट्टर यांच्यासह भाजप व धर्मनिरपेक्ष जनता दलाचे वरिष्ठ नेते उपस्थित होते.
दुष्काळाच्या मुद्द्यावरून काँग्रेसवर टीका...
राज्यातील दुष्काळी परिस्थिती हाताळण्यात काँग्रेस सरकार अपयशी ठरत असल्याचा आरोपही जोशी यांनी केला. राज्यातील आर्थिक परिस्थिती, विकासकामांवरील खर्च आणि दुष्काळ निवारणाच्या उपाययोजनांबाबत जनतेसमोर वस्तुस्थिती मांडण्याची गरज जोशी यांनी व्यक्त केली. काँग्रेस पक्षात अंतर्गत विसंगती असल्याचा आरोप करत, दुष्काळाच्या मुद्द्यावरून काँग्रेसचेच आमदार राजीनाम्याची धमकी देत आहेत. दुसऱ्या बाजूला प्रशासनातील अपयश दिसून येत असल्याची टीका जोशी यांनी केली.
दोन्ही पक्षांच्या नेत्यांची उपस्थिती
केंद्रीय राज्यमंत्री शोभा करंदलाजे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते चलवादी नारायणस्वामी, धजदचे विधिमंडळ पक्षनेते सुरेश बाबू, आमदार भोजेगौडा, धजद नेते निखिल कुमारस्वामी आणि विधान परिषद सदस्य एस. व्ही. संकनूर यांच्यासह दोन्ही पक्षांचे आमदार, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
समन्वयाने काम करणार...
विधान परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आघाडीच्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी दोन्ही पक्षांनी समन्वयाने काम करण्यावर बैठकीत चर्चा झाली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.