Local Body Elections : काँग्रेसला सर्वाधिक जागा, पण निवडणूक न लढताही भाजप नेता बनला नगराध्यक्ष; नेमकं काय घडलं?

Dholpur Nagaradhyaksha election, Girish Garg, Dholpur Nagar Parishad : काँग्रेसकडे सर्वाधिक नगरसेवक असूनही धौलपूर नगराध्यक्षपद भाजपच्या गिरीश गर्ग यांच्या ताब्यात; हायब्रीड सिस्टीममुळे निवडणूक न लढताही बिनविरोध विजय.
BJP Congress
BJP CongressSarkarnama
Published on
Updated on

Rajasthan civic elections : राजस्थानच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची मतमोजणी मागील आठवड्यात पार पडली. यामध्ये अनेक ठिकाणी सत्ताधारी भाजपचा वरचष्मा राहिला आहे. या संस्थांमध्ये सोमवारी महापौर, नगराध्यक्ष, पंचायत समिती सभापतींच्या निवडणुका होत आहेत. भाजपला बहुमत नसलेल्या ठिकाणी धक्कादायक राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत.

राज्यातील धौलपूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षांच्या निवडीची सध्या जोरदार चर्चा होत आहे. निवडणुकीत काँग्रेसचे २७ नगरसेवक निवडून आले असून भाजपला केवळ ११ जागा मिळाल्या आहेत. पण त्यानंतरही नगराध्यक्षपद भाजपच्या ताब्यात गेले आहे. विशेष म्हणजे निवडणूक न लढणारा भाजपचा पदाधिकारी नगराध्यक्ष म्हणून विराजमान झाला आहे.

नेमकं काय घडलं?

नगराध्यक्षपदी गिरीश गर्ग यांनी बिनविरोध निवड झाली आहे. धौलपूर नगरपरिषदेत एकूण ६० जागा असून काँग्रेस २७ नगरसेवकांसह सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तर भाजपला ११, अपक्ष १९ आणि बहुजन समाज पक्षाला तीन जागा मिळाल्या आहेत. नगराध्यक्ष पदासाठी ३१ नगरसेवकांचा पाठिंबा आवश्यक होता.

BJP Congress
UP state division debate : उत्तर प्रदेशचे चार तुकडे होणार, पूर्वांचलचा पहिला मुख्यमंत्री..! कॅबिनेट मंत्र्यांनी उडवून दिली खळबळ

नगराध्यक्ष निवडणुकीसाठी सोमवारी सात जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी सहा जणांनी माघार घेतली. गर्ग यांचा एकमेव अर्ज उरल्याने त्यांना बिनविरोध विजयी घोषित करण्यात आले. गर्ग यांनी नगरसेवक पदाची निवडणूकही लढविली नव्हती. त्यानंतरही त्यांनी नगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल केला आणि ते बिनविरोध निवडूनही आले.

BJP Congress
Supreme Court news : शिवसेना प्रकरणात सुप्रीम कोर्टाच्या निरीक्षणाने वाढली धडधड; मतदारांचा मुद्दा ठरणार महत्वाचा, नेमका अर्थ काय?

हे आहे महत्वाचे कारण

निवडणूक न लढताही गर्ग नगराध्यक्ष बनण्याचे कारण राजस्थानातील निवडणूक व्यवस्थाच आहे. नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी अर्ज करताना नगरसेवक म्हणून निवडून येणे बंधनकारक नाही. कोणतीही पात्र व्यक्ती थेट नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करू शकते.

या व्यवस्थेला 'हायब्रीड सिस्टीम' म्हटले जाते. यामध्ये नगरसेवकपद आणि नगराध्यक्ष पदासाठीची निवडणूक स्वतंत्रपणे होते. २०१९ पासून ही तरतूद लागू करण्यात आली आहे. मात्र, संबंधिताला पुढील सहा महिन्यांत नगरसेवक म्हणून निवडून येणे बंधनकारक आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com