Eknath Shinde Narendra Modi sarkarnama
देश

Eknath Shinde : तुम मुझको कब तक रोकोगे..., सेंट्रल हाॅलमध्ये मोदींसाठी मुख्यमंत्री शिंदेंची शेरो शायरी

Roshan More

NDA Meeting Today : लोकसभा निवडणुकीत बहुमत मिळवल्यानंतर एनडीएच्या संसदीय दलाची पहिली बैठक शुक्रवारी संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये झाली. एनडीएच्या नेतेपदी नरेंद्र मोदी यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवण्यात आला. त्या प्रस्तावाला अनुमोदन देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेरोशायरीमधून नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले. नरेंद्र मोदींनी देखील स्मित करत मुख्यमंत्र्यांच्या शेरोशायरीला प्रतिसाद दिला.

नरेंद्र मोदी Narendra Modi यांच्याकडे पाहत तुमची परवानगी असेल तर मी तुमच्यासाठी तीन लाईन बोलू इच्छतो असे म्हणत मुख्यमंत्री शिंदेंनी,'मैं उस माटी का वृक्ष नहीं जिसको नदियों ने सींचा है! बंजर माटी में पलकर मैंने मृत्यु से जीवन खींचा है । मैं पत्थर पर लिखी इबारत हूँ शीशे से कब तक तोड़ोगे? मिटने वाला मैं नाम नहीं तुम मुझको कब तक रोकोगे' हा शेर म्हटला. संसदेच्या सेंट्रल हाॅलमध्ये उपस्थित नवनिर्वाचित खासदारांनी टाळ्यांचा कडकडाट करत मुख्यमंत्र्यांच्या शेरोशायरीला प्रतिसाद दिला.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, निवडणुकीत विरोधकांनी खोटे नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला. मात्र, जनतेने पंतप्रधान मोदींना निवडले. शिवसेना भाजप हे समान विचारधारा असलेले पक्ष आहेत. भाजप आणि शिवसेनेचा जोड हा फेव्हिकोलचा जोड आहे. तो कधीच तुटणार नाही.

उद्धव ठाकरेंना टोला

शिवसेनेत फूट पडली आहे. त्यामुळे शिंदेंच्या नेतृत्वाखाली शिवसेना एनडीएमध्ये तर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेना इंडिया आघाडीत आहेत. शिंदे यांनी सेंट्रल हाॅलमध्ये भाषण करताना आपल्या शिवसेनेचा उल्लेख करताना बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना असे म्हणत अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरेंना टोला लगावला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT