PM Narendra Modi : मोदींना झाली बाळासाहेब ठाकरेंची आठवण; ‘एनडीए’चे तोंडभरून कौतुक

Modi government NDA Meeting PM Narendra Modi : पंतप्रधान मोदींनी सेंट्रल हॉलमध्ये केलेल्या भाषणादरम्यान एनडीएलतील सर्व पक्षांचे कौतुक केले.
PM Narendra Modi, Balasaheb Thackeray
PM Narendra Modi, Balasaheb ThackeraySarkarnama

New Delhi : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एनडीएच्या संसदीय दलाच्या बैठकीत एनडीएचे तोंडभरून कौतुक केले. एनडीएचा सत्ता मिळवण्याचा किंवा सरकार चालवण्याचा काही पक्षांचा समूह नाही, हा राष्ट्र प्रथमच्या मुळ भावनेने समर्पित समूह आहे, असे सांगताना मोदींना बाळासाहेब ठाकरे यांचीही आठवण झाली.

अटल बिहारी वाजपेयी, जॉर्ज फर्नांडिस, बाळासाहेब ठाकरे, शरद यादव यांनी जी बीजे पेरली होती, आज भारतातील जनतेने त्याचे मुळ घट्ट केले आहे. मागील दहा वर्षांत त्याच मुल्यांना सोबत घेत देशाला पुढे नेण्याचा प्रयत्न केल्याचे मोदी म्हणाले. 

संसदेतील सेंट्रल हॉलमध्ये एनडीएच्या संसदीय दलाची बैठक झाली. या बैठकीत नरेंद्र मोदींची संसदीय दलाच्या नेतेपती निवड करण्यात आली. यावेळी बोलताना मोदी म्हणाले, 2019 मध्ये या सभागृहात मी बोलत असताना विश्वास यावर मी जोर दिला होता. आज पुन्हा तुम्ही मला ही जबाबदारी देत आहात, याचा अर्थ आपल्यामध्ये विश्वासाचा पुल एवढा मजबूत आहे. हे अतुट नाते विश्वासावर अवलंबून आहे. ही मोठी संपत्ती असते. त्यामुळे हा क्षण माझ्यासाठी भावुक करणारा आहे. सर्वांचे आभार मानावे तेवढे थोडे आहेत.

हिंदूस्तानातील महान लोकशाहीची ताकद पाहा. देशात एनडीएला २२ राज्यांत सरकार बनविण्याची संधी लोकांनी दिली आहे. आपली ही आघाडी भारताचे स्पिरीट, भारताचा आत्मा, भारताच्या मुळांमध्ये बसला आहे, त्याचा एक प्रतिबिंब आहे. देशात दहा असे राज्य आहेत, जिथे आदिवासी बंधूंची संख्या लक्षणीय आहे. त्यापैकी सात राज्यांमध्ये एनडीएची सत्ता आहे, असे मोदी म्हणाले.

PM Narendra Modi, Balasaheb Thackeray
PM Narendra Modi : सेंट्रल हॉलमध्ये येताच मोदींनी संविधानावर टेकवला माथा

ख्रिश्चनांची संख्या अधिक असलेल्या गोवा, ईशान्य भारतामध्येही सत्ता आहे. देशाच्या राजकीय इतिहासात निवडणूकपुर्व आघाडीला एवढे यश यापुर्वी कधीही मिळालेले नाही. जे यश एनडीएला मिळाले आहे. आपण बहुमत प्राप्त केले आहे. सरकार चालवण्यासाठी बहुमत आवश्यक आहे. पण देशा चालवण्यासाठी सर्वमत गरजेचे असते. म्हणून मी देशातील जनतेला विश्वास देतो की, आम्ही देशाला पुढे नेण्यासाठी कोणतीही कसर सोडणार नाही, असा विश्वास मोदींनी व्यक्त केला.

एनडीएला जवळपास तीन दशके झाली आहेत. ही सामान्य घटना नाही. संघटनेच्या कार्यकर्त्याच्या रुपाने मी या आघाडीचा एक भाग होतो, आज माझेही नाते ३० वर्षांचा राहिला आहे, हे मी आज गर्वाने सांगतो. ही आघाडी सर्वात यशस्वी आघाडी आहे. या आघाडीने तीन टर्म पुर्ण करून चौथ्या टर्ममध्ये प्रवेश करत आहे, असे मोदींनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com