xi jinping, Operation Sindoor Sarkarnama
देश

Operation Sindoor : 'ऑपरेशन' सिंदूर चीनच्या जिव्हारी! पाकिस्तानची बाजू घेत भारताला केलं मोठं आवाहन

India Pakistan military operation : भारतीय लष्कराने थेट पाकिस्तानात आणि पाकव्याप्त काश्मिरमध्ये घुसून केलेली कारवाई चीनच्या नाकाला झोंबल्याचं पाहायला मिळत आहे. तर आधी दहशतवादावर कठोर कारवाई करण्याची भूमिका घेणाऱ्या अमेरिकेने देखील भारतीने केलेल्या कारवाईवर 'इट इज शेम' अशी प्रतिक्रिया दिली आहे.

Jagdish Patil

India PoK strike : भारतीय लष्कराने थेट पाकिस्तानात आणि पाकव्याप्त काश्मिरमध्ये घुसून केलेली कारवाई चीनच्या नाकाला झोंबल्याचं पाहायला मिळत आहे. तर आधी दहशतवादावर कठोर कारवाई करण्याची भूमिका घेणाऱ्या अमेरिकेने देखील भारतीने केलेल्या कारवाईवर 'इट इज शेम' अशी प्रतिक्रिया दिली आहे.

अशातच आता भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सुरू तणावाबाबत बोलताना चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने भारताने केलेली लष्करी कारवाई दुर्दैवी असल्याचं म्हणत पाकिस्तानची बाजू घेतली आहे.

शिवाय ऑपरेशन सिंदूरमुळे सद्यस्थितीबाबत आम्ही चिंतेत आहोत. भारत आणि पाकिस्तान हे एकमेकांचे शेजारी देश असून ते चीनचेही शेजारी आहेत असं म्हणतच चीन सर्व प्रकारच्या दहशतवादाचा विरोध करतो, असंही चीनने म्हटलं आहे.

दरम्यान, दोन्ही देशांनी शांततेच्या दृष्टीने विचार करावा, संयम बाळगावा परिस्थिती अधिक गुंतागुंतीची होईल असं कोणतंही पाऊल उचलू नये, असं आवाहान देखील त्यांनी यावेळी दोन्ही देशांना केलं आहे.

त्यामुळे सदैव दहशताद्यांना पाठीशी घालणाऱ्या पाकिस्तानवर कारवाई केल्यानंतर चीन नेहमीप्रमाणे पाकिस्तानला पाठीशी घालत असल्याचं पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे आज भारतीय लष्काराने पत्रकार परिषद घेत तपासात पहलगाम येथील हल्ला करणारे दहशतवादी आणि पाकिस्तान यांच्यात असणारे संबंध उघडकीस आल्याचं स्पष्ट केलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT