Rahul Gandhi Protest | Dharmendra Pradhan | NEET Row Sarkarnama
देश

NEET controversy : काँग्रेसने राज्यसभेत गेम फिरवला : मल्लिकार्जुन खरगेंच्या ऐनवेळच्या मागणीने मोदी सरकारची अभुतपूर्व कोंडी...

NEET Paper Leak controversy in Parliament : राहुल गांधी यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानासमोर धरणे आंदोलन केलं. त्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात देखील घेतलं. त्यामुळे आक्रमक झालेल्या काँग्रेसने सरकारने नीट पेपरफुटी प्रकरणावर संसदेच्या अधिवेशनात चर्चा करावी अशी मागणी लावून धरली होती.

Jagdish Patil

Navi Delhi 22 Jul : जवळपास मागील महिनाभरापासून नीट पेपरफुटी प्रकरणावरून दिल्लीतील जंतरमंतर येथे कॉकरोच जनता पार्टीकडून आंदोलन सुरू आहे. या आंदोलकांनी सोमवारी संसेदेवर मोर्चा देखील काढला होता. मात्र, परवानगी नसताना मोर्चा काढल्यामुळे पोलिसांनी आंदोलकांवर लाठीमार केला.

त्यामुळे हे आंदोलन आणखी चिघळलं. अशातच लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी काल थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानासमोर धरणे आंदोलन केलं. त्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. त्यामुळे आक्रमक झालेल्या काँग्रेसने सरकारने नीट पेपरफुटी प्रकरणावर संसदेच्या अधिवेशनात चर्चा करावी आणि शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी लावून धरली होती.

काँग्रेसच्या या मागणीनंतर सरकारने नीट प्रकरणावर संसदेत चर्चा करण्यास सहमती दर्शवली होती. मात्र, आज अधिवेशनाला सुरूवात होताच पुन्हा नीटच्या आणि आंदोलकांना झालेल्या मारहाणीच्या मुद्द्यावरून लोकसभेत मोठा गदारोळ झाला. त्यामुळे लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं.

लोकसभेचं कामकाज तहकूब केल्यानंतर राज्यसभेत तर काँग्रेसने गेमच फिरवला, कारण राज्यसभेतले विरोधीपक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी थेट आधी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा द्यावा, त्यानंतरच नीटच्या मुद्द्यावर चर्चा केली जाईल अशी आक्रमक भूमिका घेतली.

त्यामुळे काँग्रेसने ऐनवेळी टाकलेल्या गुगलीमुळे सरकारची मोठी कोंडी झाल्याचं पाहायला मिळालं. सभागृहात मल्लिकार्जन खरगे यांनी "सर्व चर्चा बाजूला ठेवून आधी शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा घ्या, तरच नीटच्या मुद्द्यावर चर्चा करणार", अशी भूमिका घेतली. त्यामुळे राज्यसभेचं कामकाज तीन वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं आहे.

काँग्रेसने आधी नीटच्या मुद्द्यावर अधिवेशनात चर्चा करण्यासाठी सरकारला भाग पाडलं आणि आता थेट शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा दिला तरच चर्चा करू अशी भूमिका घेतल्याने सत्ताधाऱ्यांची मोठी कोंडी झाली आहे. त्यामुळे सरकार आता या सर्व घडामोडीवर नेमकी काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT