New Dehli News : देशभरात नीट पेपरफुटीवरुन केंद्रीयमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात येत आहे. गेल्या 25 दिवसापासून कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलन सुरू आहे. दिल्लीतील जंतर मंतरवर हे आंदोलन आणि सोनम वांगचुक यांच्या उपोषणाने वातावरण तापले आहे. देशभरातून या आंदोलनास पाठिंबा वाढत असताना, राजकीय विरोधकही या आंदोलनात सहभागी झाले आहेत. त्यातच सीजेपीच्या शिष्टमंडळाने केंद्रीयमंत्री जे. पी. नड्डा यांच्या सोबत चर्चा केली. यावेळी करण्यात आलेल्या तीन मागण्यापैकी दोन मागण्या मान्य केल्या आहेत. मात्र, तिसऱ्या मागणीसाठी उद्या चर्चा होणार आहे. त्यापूर्वीच केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून सर्वात मोठी घोषणा लवकरच करण्यात येणार आहे. त्यामुळे सीजेपीच्या आंदोलनाला मोठे यश येणार असून सर्वांचे त्याकडे लक्ष लागले आहे.
नीट पेपर लीक प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर या घोषणेला महत्त्व प्राप्त झालं आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत मोठी घोषणा केली जाणार असल्याचे समजते. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे, त्यासाठी गेल्या महिनाभरापासून कॉकरोच जनता पार्टीचं दिल्लीमधील जंतर मंतर मैदानावर आंदोलन सुरू आहे.
सीजेपीच्या वतीने संसदेवर देखील मोर्चा काढण्यात आला होता. दरम्यान यामुळे आता राष्ट्रीय टेस्टिंग एजेन्सी (NTA) च्या कार्यपद्धतीवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आता केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून एक मोठी घोषणा करण्यात येणार आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शिक्षण मंत्रालयाकडून NTA मधील सुधारणांशी संबंधित महत्त्वाचे निर्णय आणि नवीन प्रणाली जाहीर केली जाण्याची शक्यता आहे.
परीक्षेमध्ये पारदर्शकता आणि सुरक्षा यांची जबाबदारी निश्चित करण्याच्या दिशेनं हे एक मोठं पाऊल असणार आहे, असे सांगितले जात आहे. मात्र अद्याप यासंदर्भातील मंत्रालयाकडून कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. या घोषणेने सीजेपीच्या आंदोलनाला मोठे यश येणार असल्याने सर्वांचे त्याकडे लक्ष लागले आहे.
दरम्यान, नीट परीक्षेचा पेपर फुटल्यानंतर देशभरात मोठा गोंधळ उडाला होता. अखेर ही परीक्षा रद्द करून पुन्हा परीक्षा घेण्यात आली. नीट परीक्षेचा पेपर रद्द झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याच्या देखील काही घटना घडल्या होत्या. त्यामुळे वातावरण चांगलंच तापले होते. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी कॉकरोच जनता पार्टीने लावून धरली आहे. त्याबाबत उद्या चर्चा होणार आहे. त्यानंतर शनिवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास बैठक होणार आहे. त्यामध्ये राजीनाम्या विषयी पुन्हा एकदा चर्चा करण्यात येणार असल्याचे समजते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.