NEET Protest Student Attack Sarkarnama
देश

NEET Protest Student Attack : 'नीट' आंदोलनात सहभागी विद्यार्थ्यावर जीवघेणा हल्ला; 'मोदींच्या राजीनाम्याची मागणी का केली?' असा प्रश्न करत मारहाण

Student attacked after NEET protest; police register FIR against four unidentified persons : मारहाणीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजीनाम्याच्या मागणीचा उल्लेख केल्याचा विद्यार्थ्याचा दावा; AISAने ABVPवर आरोप केले, पोलिसांनी अद्याप दुजोरा दिलेला नाही.

Pradeep Pendhare

NEET controversy : ‘नीट’ प्रश्नपत्रिका फुटीच्या निषेधार्थ झालेल्या आंदोलनात सहभागी झालेल्या 19 वर्षीय विद्यार्थ्यावर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे.

या प्रकरणी चार अज्ञात हल्लेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, 28 जुलै रोजी बंगळुरूच्या जालहळ्ळी परिसरात ही घटना घडली. संबंधित विद्यार्थी (Student) घरी परतत असताना दोन दुचाकींवर आलेल्या तोंडाला मास्क लावलेल्या चार व्यक्तींनी त्याचा रस्ता अडवला. लाकडी दांडक्याने त्याला बेदम मारहाण करून ते चौघे तेथून पसार झाले.

जखमी विद्यार्थ्याने दिलेल्या तक्रारीत, हल्लेखोरांनी "पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या राजीनाम्याची मागणी करण्याची तुझी हिंमत कशी झाली?" असा सवाल करत मारहाण केल्याचे सांगितले. या तक्रारीच्या आधारे चार अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला.

दरम्यान, ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशन (AISA)ने हा हल्ला आपल्या कार्यकर्त्यावर झाल्याचा दावा केला आहे. तसेच, या घटनेमागे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP) कार्यकर्त्यांचा सहभाग असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. मात्र, या आरोपांना पोलिसांनी दुजोरा दिलेला नाही.

विद्यार्थ्यांचा देशव्यापी विद्यार्थी-युवा आंदोलनात सहभाग

संबंधित विद्यार्थी बंगळुरूतील फ्रीडम पार्क येथे आयोजित करण्यात आलेल्या देशव्यापी विद्यार्थी-युवा आंदोलनात सहभागी झाला होता. आंदोलनात केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत केंद्र सरकारच्या शैक्षणिक धोरणाविरोधात निदर्शने करण्यात आली होती.

हल्लेखोरांच्या शोधासाठी विशेष तपास पथके

विद्यार्थ्यावरील हल्ल्याच्या प्रकरणातील संशयितांचा शोध सुरू असून त्यांना ताब्यात घेण्यासाठी विशेष पथके काम करत असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT