Delhi Police FIR : विद्यार्थी आंदोलकांवर खुनाच्या प्रयत्नासह 13 कलमांखाली गुन्हा; लांबा-शर्मा निलंबनासाठी 'कॉक्रोच'चा अल्टिमेटम

Abhijit Dipke demands action against Delhi Police officers after NEET protest lathicharge; FIR filed against student protesters under 13 BNS sections : दिल्लीतील NEET आंदोलनानंतर अभिजित दिपके यांनी दिल्ली पोलिसांवर कारवाईची मागणी केली असून, आंदोलकांवर खुनाच्या प्रयत्नासह 13 कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Delhi Police Lathicharge
Delhi Police LathichargeSarkarnama
Published on
Updated on

Student Protest : नीट (NEET) प्रश्नपत्रिका फुटीप्रकरणावरून दिल्लीत झालेल्या विद्यार्थी आंदोलनानंतर निर्माण झालेला वाद अद्यापही कायम आहे.

या आंदोलनादरम्यान झालेल्या पोलिसांच्या लाठीचार्जवरून कॉक्रोच जनता पक्षाच्या उपहासात्मक आंदोलनाचे संस्थापक अभिजित दिपके यांनी दिल्ली पोलिसांवर गंभीर आरोप करत संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे.

संसदेकडे काढण्यात आलेल्या विद्यार्थी मोर्चादरम्यान दिल्ली पोलिसांनी (Police) आंदोलकांवर लाठीचार्ज केल्याचा आरोप आंदोलकांकडून करण्यात आला होता. या घटनेत विशेषतः महिला आंदोलकांना त्रास झाल्याचा दावाही करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर अभिजित दिपके यांनी दिल्ली पोलिसांचे डीसीपी संदीप लांबा, एसीपी अजय शर्मा आणि सचिन शर्मा यांच्यावर कारवाई करून त्यांना निलंबित करण्याची मागणी केली आहे.

धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan) यांनी केंद्रीय शिक्षणमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज केल्याचा आरोप असलेल्या पोलिस अधिकाऱ्यांबाबतही कारवाई व्हावी, अशी भूमिका दिपके यांनी मांडली.

Delhi Police Lathicharge
Amit Shah Resignation Demand : अमित शहांनीही राजीनामा द्यावा; NEET आंदोलन, उमर खालिद पोस्टर अन् काँग्रेसचा मोठा निशाणा

दिपके यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात संबंधित पोलिस अधिकाऱ्यांवर टीका करत, "आंदोलनादरम्यान आम्हाला धमकावण्यात आले. संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई होईपर्यंत आम्ही मागे हटणार नाही," असे म्हटले आहे. तसेच त्यांनी आंदोलनात सहभागी झालेल्या जेन-झी विद्यार्थ्यांच्या धैर्याचे कौतुक करत आंदोलनाच्या यशाचे श्रेय आंदोलकांना दिले.

Delhi Police Lathicharge
Mule Account : 'फक्त खाते वापरायला द्या, कमिशन मिळेल' म्हणत जाळ्यात; अहिल्यानगरात 12 जणांवर गुन्हे, 40.68 लाखांची सायबर फसवणूक उघड

आंदोलकांवर 13 कलमांखाली गुन्हा

दरम्यान, आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचारप्रकरणी दिल्ली पोलिसांनी विद्यार्थी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी खुनाच्या प्रयत्नासह भारतीय न्याय संहितेतील (BNS) विविध 13 कलमांखाली गुन्हे नोंदवले आहेत.

एफआयआरमध्ये काय म्हटले...

दिल्ली पोलिसांच्या एफआयआरनुसार, आंदोलकांनी संसदेच्या उच्च सुरक्षा क्षेत्रात प्रवेश करण्याचा प्रयत्न करत सुरक्षा बॅरिकेड तोडण्याचा प्रयत्न केला तसेच पोलिसांवर हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला आहे. एका पोलिस निरीक्षकाच्या तक्रारीवरून कर्तव्य पथ पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आंदोलकांकडून पोलिसांच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित करण्यात येत असताना, दिल्ली पोलिसांनी मात्र कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यक ती कारवाई केल्याचे आपल्या एफआयआरमध्ये नमूद केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com