NEET to Go Online From Next Year After Paper Leak, Announces Dharmendra Pradhan Sarkarnama
देश

NEET UG News: नीट पेपर लीकनंतर मोठा निर्णय; पुढील वर्षी NEET ऑनलाइन होणार, शिक्षणमंत्री धर्मंद्र प्रधान यांची घोषणा

NEET UG Exam Online From Next Year: NEET UG परीक्षेत मोठे बदल जाहीर करण्यात आले आहेत. पुढील वर्षापासून परीक्षा ऑनलाइन पद्धतीने होणार असल्याची घोषणा शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केली.

Mangesh Mahale

NTA to conduct NEET exam online from 2027: नीट परीक्षा (NEET UG 2026) पेपर लीक प्रकरणानंतर केंद्र सरकार आणि एनटीए (NTA) अ‍ॅक्शन मोडमध्ये आले आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मंद्र प्रधान ( Dharmendra Pradhan) यांनी आज महत्त्वाच्या घोषणा केली.

पुढील वर्षापासून NEET परीक्षा संगणक आधारित म्हणजेच ऑनलाइन पद्धतीने घेण्याचा निर्णय करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यंदा 21 जून रोजी होणारी NEET परीक्षा दुपारी 2 ते 5.15 या वेळेत होणार असून विद्यार्थ्यांना 15 मिनिटांचा अतिरिक्त वेळ दिला जाणार असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

21 जूनच्या परीक्षेसाठी 14 जूनपर्यंत प्रवेशपत्र उपलब्ध करून दिले जाईल, अशी माहितीही त्यांनी दिली. पेपर लीक प्रकरणानंतर विद्यार्थ्यांचा विश्वास पुन्हा मिळवण्यासाठी परीक्षा प्रक्रियेत मोठे बदल करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

NTA ही सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर स्थापन झालेली संस्था असून ती देशातील सुमारे एक कोटी विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेत असल्याचे धर्मेंद्र प्रधान यांनी नमूद केले. याच पार्श्वभूमीवर परीक्षा प्रणाली अधिक पारदर्शक आणि सुरक्षित करण्यासाठी सुधारणा करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

NEET UG 2026 पेपर खुद्द नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA)च्या आतूनच फुटल्याची शक्यता सूत्रांकडून व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणात NTAमधील काही अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांचा सहभाग आहे का, याची चौकशी करण्यासाठी स्वतंत्र समिती नेमण्यात आली आहे.

देशातील लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य ठरवणारी ही परीक्षा ३ मे रोजी पार पडली होती. मात्र राजस्थान पोलिसांच्या स्पेशल ऑपरेशन ग्रुप (SOG)च्या तपासात धक्कादायक माहिती समोर आल्यानंतर ही परीक्षा अधिकृतपणे रद्द करण्यात आली आहे.

तपासादरम्यान उघड झाले की, परीक्षेच्या तब्बल ४२ तास आधीच प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांच्या मोबाईलवर पोहोचली होती. १ मे रोजीच पेपर लीक झाला होता आणि तो टेलिग्राम तसेच व्हॉट्सॲपच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात पसरवण्यात आला.

सर्वात धक्कादायक बाब म्हणजे हा ओरिजनल पेपर ‘गेस पेपर’ असल्याचे भासवत टेलिग्रामवर फिरवण्यात आला होता, जेणेकरून कोणालाही संशय येऊ नये. राजस्थानमधील सीकर परिसरातील अनेक हॉस्टेल आणि पीजीमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत हा पेपर परीक्षेच्या दोन दिवस आधीच पोहोचल्याची माहिती तपासात समोर आली आहे.

या संपूर्ण प्रकरणात मोठ्या आर्थिक व्यवहारांचाही संशय व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे आता तपास यंत्रणांचे लक्ष NTAच्या अंतर्गत व्यवस्थेकडे वळले असून, पेपर फुटीमागे नेमके कोण आहे याचा शोध घेतला जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT