IAS Transfer: फडणवीस सरकारचा बदल्यांचा धडाका; डॉ. पुलकुंडवार ग्रामविकास विभागाचे नवे सचिव, चार IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या

Fadnavis Government Transfers 4 Senior IAS Officers:फडणवीस सरकारकडून चार वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांची ग्रामविकास विभागाच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
IAS Transfar
IAS TransfarSarkarnama
Published on
Updated on

IAS officers transfer: राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेत आल्यानंतर प्रशासनात मोठ्या प्रमाणावर फेरबदल सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. गेल्या काही महिन्यांपासून राज्यात सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा सपाटा सुरू आहे.

आता पुन्हा एकदा सामान्य प्रशासन विभागाने चार वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले आहेत. त्यामुळे मंत्रालयीन आणि प्रशासकीय वर्तुळात या बदल्यांची जोरदार चर्चा रंगली आहे.

IAS Transfar
TET Compulsory For Promotion: ZP शिक्षकांना मोठा धक्का! TET शिवाय पदोन्नती नाही; हायकोर्टाने स्पष्टच सांगितलं

राज्य सरकारच्या नव्या आदेशानुसार पुणे विभागाचे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्याकडे ग्रामविकास आणि पंचायत राज विभागाच्या सचिवपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

ग्रामीण महाराष्ट्राशी थेट संबंधित आणि राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या या खात्याची धुरा आता अनुभवी अधिकाऱ्याकडे दिल्याने आगामी काळात ग्रामविकास विभागात मोठ्या हालचाली पाहायला मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

क्रीडा व युवक कल्याण आयुक्त शीतल तेली-उगले यांची बदली पुणे विभागीय आयुक्तपदी करण्यात आली आहे. त्यांच्या जागी दीपक सिंगला यांची क्रीडा व युवक सेवा आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली. गोंदिया जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मुरुगानंथम एम. यांची बदली नागपूर महापालिकेत अतिरिक्त आयुक्तपदी करण्यात आली आहे.

डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार हे महाराष्ट्र केडरमधील अभ्यासू अधिकारी म्हणून ओळखले जातात. यापूर्वी त्यांनी नाशिक महापालिका आयुक्त, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे (Maharashtra State Road Development Corporation) सहव्यवस्थापकीय संचालक तसेच साखर आयुक्त म्हणून काम करताना अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले होते. विशेषतः साखर उद्योग आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांशी संबंधित प्रश्न हाताळताना त्यांनी प्रशासनात वेगळी छाप निर्माण केली होती.

IAS Transfar
Maharashtra Teacher News: समान काम, समान वेतन! उच्च न्यायालयाचा विषय शिक्षकांना मोठा दिलासा

आता ग्रामविकास विभागाची जबाबदारी त्यांच्या हाती आल्याने राज्यातील ग्रामपंचायतींचे बळकटीकरण, जलयुक्त शिवार 2.0, ग्रामीण पाणीपुरवठा योजना आणि रोजगार निर्मिती कार्यक्रमांना अधिक गती मिळणार का, याकडे राजकीय व प्रशासकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com