PM Narendra Modi Sarkarnama
देश

Narendra Modi : 'नेहरू, इंदिरा गांधींना भारतीय लोक आळशी वाटत होते'; पण..., मोदींनी सभागृहात काँग्रेसला सुनावले

Political News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत काँग्रेसवर घणाघाती टीका केली. यावेळी काँग्रेस खासदारांनी घोषणाबाजी केली.

Sachin Waghmare

Delhi News : भारतीय लोक आळशी आहेत असे काँग्रेसचे नेते पंडित नेहरू, इंदिरा गांधी यांना वाटत होते. भारतीयांत मेहनत करण्याची ताकद नाही, असेही पंडित नेहरु म्हणत होते. त्यांच्या या मानसिकतेमुळे देशाचे मोठे नुकसान झाले आहे, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत काँग्रेसवर घणाघाती टीका केली. यावेळी काँग्रेस खासदारांनी घोषणाबाजी केली.

प्रत्येक योजनेला आतापर्यंत काँग्रेसने मोठा विरोध केला आहे. काँग्रेसच्या वेगाने विकास केला असता तर विकास करण्यासाठी १०० वर्ष लागली असती. काँग्रेसच्या सुस्त वेगाशी आपली स्पर्धा होऊच शकत नाही. काँग्रेसमुळेच विरोधी पक्षाचे मोठे नुकसान झाले असल्याचा आरोप पंतप्रधान मोदींनी केला.

आम्ही गरिबांसाठी आणि शहरी गरिबांसाठी ४ लाख घरे बनवली. जर काँग्रेसच्या वेगानं आम्ही चाललो असतो तर याच कामासाठी १०० वर्षे लागली असती. त्यासाठी पाच पिढ्या लागल्या असत्या. आम्ही १७ कोटींहून अधिक गॅस कनेक्शन दिली. जर काँग्रेसच्या वेगानं गेलो असतो तर ६० वर्षे लागली असती.

लवकरच भारत जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था म्हणून पुढे येणार आहे. आज आपण पाचव्या क्रमांकावर पोचलो आहोत. २०१४ मध्ये सत्तेत येण्यापूर्वी जगात अकराव्या स्थानावर होतो. माझ्या तिसऱ्या टर्ममध्ये भारत तिसऱ्या स्थानावर येईल, असा आशावाद यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

काँग्रेसकडून एकच प्रॉडक्ट वारंवार लॉन्च करण्यात आले आहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यावर सडकून टीका केली. लोकशाहीसाठी घराणेशाही घातक आहे. घराणेशाहीमुळं देशाचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे.

विरोधक म्हणतात विकास आपोआप होईल, तसे होत नसते. त्यांनी भाषणातून एक एक मुद्दा घेत काँग्रेसवर हल्लाबोल केला. आमच्या कारकिर्दीत गरिबासाठी आम्ही चार कोटी नागरिकाना पक्के घरे दिली आहेत, तर ८० कोटी नागरिकाना धान्य पुरवठा केला आहे. त्याचा फायदा होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

SCROLL FOR NEXT