Narendra Modi On Budget 2024 : 'बजेट विकसित भारताच्या 'या' चार स्तंभावर आधारलेला'; मोदी म्हणाले...

Budget 2024 updates : "दोन कोटी महिलांना लखपती बनवण्याचे लक्ष्य ठेवले होते, आता हे लक्ष्य तीन कोटींचं आहे."
Narendra Modi On Budget 2024
Narendra Modi On Budget 2024Sarkarnama
Published on
Updated on

Budget highlights 2024 : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी 2024-25 या आर्थिक वर्षाचा अंतरिम अर्थसंकल्प संसदेत सादरल केले आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी आज सादर होत असलेल्या अंतरिम अर्थसंकल्पात अर्थमंत्री नागरिकांना आकर्षित करण्यासाठी मोठ्या घोषणा केल्या आहेत. मोदी सरकारच्या कार्यकाळात एक कोटी महिलांना लखपती बनवण्याचे उद्दीष्ट गाठले असल्याचेही, सीतारामण यांनी नमूद केले. यानंतर आता पंतप्रधान मोदींनी बजेटबाबत भाष्य केले आहे. (Latest Marathi News)

Narendra Modi On Budget 2024
Budget 2024 Updates : देशातील एक कोटी महिला 'लखपती दीदी' बनल्या; सीतारमण यांचा दावा!

नरेंद्र मोदी म्हणाले, "संशोधनासाठी एक लाख कोटी रुपयांचा निधींच्या तरतूदीची घोषणा करण्यात आली आहे. स्टार्टअपसाठी कर सवलती आणि लाभांची घोषणा करण्यात आली. या बजेटमध्ये फिस्कल डेफिसीटला नियंत्रणात ठेवून, कॅपिटल एक्स्पेंडिचरला 11 लाख 11 हजार 111 कोटींची ऐतिहासिक उंची देण्यात आली आहे. अर्थ जाणकारांच्या भाषेत सांगितलं तर हे स्वीट स्पाँट आहे. याने एकविसाव्या शतकातील भारताच्या पायाभूत सुविधांच्या विकासासोबतच, तरुणांसाठी अनेक रोजगाराच्या संधी निर्माण होतील."

Narendra Modi On Budget 2024
Union Budget 2024 live : मोदी सरकारचा जबरदस्त कॉन्फिडन्स; टॅक्समध्ये कोणताही बदल नाही...

मोदी पुढे म्हणाले, "बजेटमध्ये वंदे भारत दर्जाच्या 40 हजार रेल्वेच्या डबे सामान्य रेल्वेला जोडण्याची घोषणा करण्यात आली आहे. यामुळे करोडो प्रवाशांची यात्रा सुखकर होईल. गरीबांसाठी शहरात आणि गावांत चार कोटी घरांची निर्मिती केली आहे. दोन कोटी नवे घर बनवण्याची लक्ष्य ठेवले आहे. दोन कोटी महिलांना लखपती बनवण्याचे लक्ष्य ठेवले होते, आता हे लक्ष्य तीन कोटींचं आहे."

"आयुष्मान योजनेने गरीबांना खूप सहाय्य केले आहे. आता आंगणवाडी, आशा वर्कर, त्या सर्वांना या योजनेचा लाभ मिळेल. या बजेटमधून गरिब आणि मध्यमवर्गाला उत्पन्नाची संधी निर्माण करण्याचे विशेष भर देण्यात आले आहे," याचाही उल्लेख मोदींनी केला.

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com