मुंबई : शिवसेनेचे नेते, खासदार संजय राऊत (shivsena mp sanjay raut)यांनी भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असताना राऊतांनी ''बाप-बेटे जेलमध्ये जाणार'' असे म्हटलं होते.
या पार्श्वभूमीवर किरीट सोमय्यांचे पुत्र नील सोमय्या (neil somaiya) यांनी अटकपूर्व जामीनासाठी मुंबईच्या सत्र न्यायालयात धाव घेतली होती. त्यांची याचिका फेटाळल्यानंतर नील सोमय्यांनी मुंबईच्या उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ही याचिका त्यांनी मागे घेतली आहे.
''राज्य सरकार सोमय्या यांच्या विरोधात सध्या कोणत्याही प्रकारची चौकशी करत नाही,'' अशी माहिती राज्य सरकारने दिली आहे. संजय राऊतांनी टि्वट करीत ''बाप बेटे जेल मध्ये जाणार! Wait and watch!कोठडीचे sanitization सुरू आहे.. जय महाराष्ट्र!'' असे म्हटले होते.
''नील सोमय्यांनी पीएमसी बँकेचे पैसे आपल्या प्रकल्पात वापरले असून बाप बेटे दोनो जेल मे जाएंगे,'' असा गंभीर आरोप राऊतांनी केला होता. शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नील सोमय्या आणि पीएमसी बँक घोटाळ्यातील प्रमुख आरोपी राकेश वाधवान यांचे संबंध असल्याचा दावा केला होता.
नील सोमय्या यांनी निकॉन इन्फ्राच्या माध्यमातून अनेक ठिकाणी जमिनी बाजारभावापेक्षा कमी दरात मिळवल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता. त्यानंतर संजय राऊत यांनी आरोप सिद्ध करून दाखवावेत, आम्ही कुठल्याही न्यायालयात जाणार नाही, असा दावा किरीट सोमय्या यांनी केला होता.
नील सोमय्या यांचे नाव एका खंडणीच्या प्रकरणात आले होते. हे जुने प्रकरण असून याप्रकरणी नील यांची नव्याने चौकशी सुरू करण्यात आली आहे. मुलुंड पोलीस ठाण्यात त्यांचा जबाब नोंदवण्यात आला. नील यांच्यावर बिल्डरकडून खंडणी उकळल्याचा आरोप झाला आहे. त्यामुळे नील यांचा जबाब नोंदवल्यानंतर पोलीस आता कोणती कारवाई करतात, याची उत्सुकता आहे. दरम्यान, अटक होण्याची शक्यता असल्याने नील यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.