Nepal Bus Accident Sarkarnama
देश

Video Nepal Bus Accident : नेपाळमध्ये भारतीय प्रवाशांची बस नदीत कोसळली, 16 जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील लोकांचाही समावेश

Nepal Bus Accident : नेपाळमधून एक दु:खद घटना समोर आली आहे. 40 भारतीय प्रवाशांना घेऊन जाणारी एक बस नदीत कोसळल्यामुळे 16 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.

सरकारनामा ब्युरो

Nepal Bus Accident : नेपाळमधून एक दु:खद घटना समोर आली आहे. 40 भारतीय प्रवाशांना घेऊन जाणारी एक बस नदीत कोसळल्यामुळे 16 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकजण गंभीर जखमी आहेत. नेपाळ पोलिसांनी या घटनेची माहिती दिली आहे.

शुक्रवारी (ता.23 ऑगस्ट) सकाळी साडे अकराच्या सुमारास नेपाळमध्ये (Nepal) 40 भारतीय प्रवाशांना घेऊन जाणारी बस तनहुन जिल्ह्यातील मर्स्यांगडी नदीत कोसळली. ही बस पोखराहून काठमांडूला जात असताना बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने ती नदीत कोसळली.

या दुर्घटनेत 16 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे, तर या प्रवाशांना घेऊन जाणारी बस ही उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) गोरखपूर इथली नोंदणीकृत असून ती नेपाळकडे निघाली होती. दुथडी भरुन वाहणाऱ्या नदीत काही भाविक वाहून गेल्यामुळे ते अद्याप बेपत्ता आहेत. काही भाविक भुसावळ तालुक्यातील वरणगाव- तळवेल व परिसरातील असल्याचे सांगितले जात आहे.

जखमींपैकी 5 जणांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. शिवाय या बसमधील प्रवासी महाराष्ट्रातील (Maharastra) असल्याची माहिती आहे. नेपाळच्या सशस्त्र पोलिस दलासह नेपाळ आपत्ती व्यवस्थापनाचे एसएसपी माधव पौडेल यांच्या नेतृत्वाखाली 45 पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकासह दुर्घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे.

नेपाळच्या पोलिसांनी सांगितलं की, घटनास्थळावरून 16 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तर जखमींना वाचवण्यात आले असून त्यांना उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT