Nepal Politics: नेपाळमध्ये मोठा राजकीय भूकंप झाला आहे.नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल प्रचंड यांना मोठा धक्का बसला आहे. अवघ्या 19 महिन्यांतच त्यांना सत्तेतून पायउतार होण्याची नामुष्की ओढवली आहे.
माजी पंतप्रधान केपी शर्मा यांच्या नेतृत्वातील सीपीएन-यूएमएलने प्रचंड सरकारचा पाठिंबा काढून घेतल्याने सरकारविरोधात आणलेल्या विश्वासदर्शक ठरावात त्यांचा धक्कादायक पराभव झाला आहे. त्यामुळे नेपाळमधील प्रचंड सरकार कोसळले आहे.
नेपाळच्या संसदेत शुक्रवारी(ता.12) विश्वासदर्शक ठराव घेण्यात आला आहे.या ठरावात 275 सदस्यांच्या सभागृहात प्रचंड यांना अवघे 63 मते मिळाली आहे.तर प्रस्तावाच्या विरोधात 194 मते पडली.विश्वासदर्शक ठराव जिंकण्यासाठी किमान 138 मतांची गरज होती.त्यामुळे 25 डिसेंबर 2022 रोजी सत्तेत आलेल्या प्रचंड यांना आता 19 महिन्यातच पंतप्रधानपद सोडावं लागणार आहे.
आता नेपाळमध्ये NCA आणि CPN-UML युती एकत्र आली तर त्यांच्याकडे बहुमतापेक्षा जास्त संख्याबळ असणार आहे. त्यांच्याकडे एकूण 167 मतं असणार आहेत. त्यामुळे देउबा आणि ओली पुन्हा एकदा नेपाळमध्ये सरकार स्थापन करण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.