Rahul Gandhi News : स्मृती इराणींबाबत अपमानस्पद टिप्पणी करणाऱ्यांना राहुल गांधींची 'Warning', म्हणाले..

Rahul Gandhi on Smriti Irani Trolling : उत्तर प्रदेशमधील अमेठी लोकसभा मतदारसंघातून पराभूत झाल्यानंतर स्मृती इराणींना सोशल मीडियावर सातत्याने ट्रोल केले जात आहे.
Rahul Gandhi  on Smriti Irani Trolling
Rahul Gandhi on Smriti Irani TrollingSarkarnama
Published on
Updated on

Rahul Gandhi warns to congress leaders : माजी केंद्रीयमंत्री आणि भाजप नेत्या स्मृती इराणींबद्दल असभ्य टिप्पणी करणाऱ्यांना, काँग्रेसचे नेते आणि रायबरेलीचे खासदार राहुल गांधी यांनी असं न करण्यासाठी ताकीद दिली आहे. त्यांनी हेही म्हटले आहे की आयुष्यात जय-पराजय सुरूच असतो. परंतु कोणाला अपमानित करणे हे कमकुवतपणाचे लक्षण आहे, सामर्थ्याचे नाही.

याचबरोबर राहुल गांधी(Rahul Gandhi) यांनी काँग्रेस नेत्यांना इशारा देत हे देखील म्हटले की, कोणत्याही नेत्याने स्मृती इराणींबाबत वाईट बोलू नये. राहुल गांधींनी एक्सवर लिहिले की, जीवनात हार-जीत सुरूच असते. मी सर्वांनाच आग्रह करतो की, त्यांनी स्मृती इराणींबद्दल किंवा अन्य नेत्यांबद्दल अपमानास्पद भाषेचा वापर आणि अयोग्य वर्तवणूक ठेवू नये. लोकांना अपमानित करणं हे कमकुवतपणाचे लक्षण आहे, मजबूतीचे नाही.

Rahul Gandhi  on Smriti Irani Trolling
Constitution of India : संविधानाबाबत मोदी सरकारचा मोठा निर्णय; काँग्रेसला गाठलं खिंडीत...

राहुल गांधी नेमंक असं का म्हणाले? -

उत्तर प्रदेशमधील अमेठी लोकसभा मतदारसंघातून पराभूत झाल्यानंतर स्मृती इराणींना(Smriti Irani) सोशल मीडियावर सातत्याने ट्रोल केले जात आहे. या जागेवरून काँग्रेस नेते किशोरी लाल शर्मा यांनी त्यांचा मोठ्या फरकाने पराभव केला. याआधीच्या 2019च्या लोकसभा निवडणुकीत येथून स्मृती इराणींनी राहुल गांधींचा पराभव केला होता. यावेळी जेव्हा स्मृती इराणींचा अमेठीमधून पराभव झाले तेव्हा त्यांना ट्रोल केले जात आहे. शिवाय, त्यांनी शासकीय बंगाल रिकामा केला आहे, त्यावरून त्यांच्यावर निशाणा साधला जात आहे.

Rahul Gandhi  on Smriti Irani Trolling
Arvind Kejriwal : केजरीवालांना जामीन मंजूर, तरीही ‘तिहार’मध्येच राहावे लागणार; काय आहे कारण?

राहुल गांधींनी सोशल मीडियावर जी पोस्ट केली आहे, त्यावर युजर्स आणि समर्थकांनीही प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिले की, डन सर, परंतु ही लोकं तुमच्या आणि आपल्याबद्दल खूप भयानक बोलत होते. परंतु तरीही तुम्ही जर म्हणत असाल तर ठीक आहे. तर आणखी एका युजर्सन लिहिले की, राहुल गांधींनी खरं म्हटलं आहे.

लोकांनी एखाद्या महिलेबाबत बोलताना सावधता बाळगली पाहिजे. राजकीय मतभेद कुणाला बदनाम करण्याची किंवा कमी लेखण्याची परवानगी देत नाही. राजकीय मतभेदांची नेहमीच नैतिक मूल्ये कायम ठेवत टीका केली गेली पाहिजे.

(Edited by Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com