Nepal Political Crisis: नेपाळमध्ये तरुणाईच्या उद्रेकानं सध्या थैमान घातलं असून पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी राजीनामा दिला आहे. तर उपपंतप्रधान असलेल्या ....यांना तरुणांनी रस्त्यावर पळवून पळवून मारल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. त्याचबरोबर आंदोलक तरुणांवर गोळीबाराचे आदेश देणाऱ्या डीएसपीची याच तरुणांनी मॉब लिचिंग करत ठार केलं आहे. त्यामुळं नेपाळमध्ये जनरेशन झेड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तरुणांचं अक्षरशः तांडव सुरु आहे.
नेपाळमधील तरुणांनी विद्यमान सरकारविरोधात आंदोलन केलं आहे. त्यांनी अक्षरशः सरकारचं उलथवून टाकलं असून अनेक मंत्र्यांना या तरुणांनी 'सळो की पळो' करुन सोडलं आहे. अर्थमंत्री बिष्णू पौडेल यांना रस्त्यावरुन जात असताना आंदोलकांनी लाथ मारुन खाली पाडलं आणि पळवून पळवून मारलं. हे नेपाळमधील प्रतिष्ठीत नेते असून कम्युनिस्ट पार्टीचे उपाध्यक्षही राहिले आहेत. तसंच त्यांना पकडून घेऊन जातातानाचा व्हिडिओ व्हायरल झाल आहे.
तसंच संसदेच्या इमारतीला त्यांनी आग लावली असून काही मंत्र्यांची घरंही पेटवून दिली आहेत. त्याचबरोबर उपपंतप्रधान यांनाही मारहाण करण्यात आली असून पंतप्रधानांनी तर गुपचूप राजीनामा देऊन लष्कराच्या हेलिकॉप्टरमधून पळ काढला आहे. त्याचबरोबर राष्ट्रपतींनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
तसंच आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी सगळीकडं जाळपोळ सुरु झाल्यानंतर त्यांच्यावर पोलिसाकंडून सुरुवातीला अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडण्यात आल्या. पण त्याचाही आंदोलक तरुणांवर काहीही परिणाम होत नसल्याचं लक्षात आल्यानंतर पोलिसांनी थेट गोळीबार केला. यामध्ये २० हून अधिक तरुणांचा मृत्यू झाला. या गोळीबाराचे आदेश द्या डीसीपींनी दिले त्या पोलिस अधिकाऱ्यालाही नेपाळच्या आंदोलक तरुणांनी पकडलं आणि त्यांना सर्वांनी मिळून बेदम मारहाण केली. या मारहाणीत त्यांचा मृत्यू झाला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.