Benjamin Netyanahu Called Narendra Modi Benjamin Netyanahu Called Narendra Modi
देश

Netyanahu-Modi: नेत्यानाहूंचा PM मोदींना फोन! कॅप्टन मच्छार यांचा होणार मोठा सन्मान; स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमासाठी दिलं निमंत्रण

Netyanahu Call Modi: इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन करुन खास कार्यक्रमासाठी निमंत्रण दिलं आहे. फोनवरुन झालेल्या संभाषणाची माहिती त्यांनी खास हिंदी भाषेत ट्विट करुन दिली आहे.

Amit Ujagare

Netyanahu Call Modi: इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन करुन खास कार्यक्रमासाठी निमंत्रण दिलं आहे. फोनवरुन झालेल्या संभाषणाची माहिती त्यांनी खास हिंदी भाषेत ट्विट करुन दिली आहे. सर्वात खास बाब म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रमुख पाहुणे असतील पण त्याचबरोबर भारतीय नागरिक आणि फ्लायदुबई या विमानाचे पायलट असलेल्या स्मित मच्छार यांचाही गौरव करण्यात येणार आहे.

नेत्यानाहू यांचं ट्विट

नेत्यानाहू यांनी ट्विटमध्ये म्हटलं की, मी माझे मित्र, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केली आणि त्यांना इस्रायलच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त धाडसी पायलट स्मित मच्छार यांच्यासह मशाल प्रज्वलित करण्यासाठी आमंत्रित केलं आहे. या निमंत्रणासाठी मोदींनी मला धन्यवाद दिले असून त्यांनी म्हटलं की, जमिनीवरील आणि आकाशातील दहशतवादाविरोधात मिळून लढत आहोत. त्यांनी दोन्ही देशांममधील मजबूत आणि अनेक वर्षांपूर्वीच्या संबंधांचं कौतुक देखील केलं आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील ट्विट करुन दोघांमधील संभाषणाचा तपशील थोडक्यात सांगितला आहे. ट्विटमध्ये मोदी म्हणतात, "इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांचा मला फोन आला होता. यावेळी झालेल्या संभाषणात आम्ही आमच्या द्विपक्षीय संबंधांमधील निरंतर गतीचा आढावा घेतला आणि आमची भागीदारी अधिक दृढ करण्याच्या आमच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. आम्ही पश्चिम आशियातील अलिकडील घडामोडींवरही चर्चा केली आणि या प्रदेशात शांतता व स्थिरता पुन्हा प्रस्थापित करण्याच्या तातडीच्या गरजेवर भर दिला"

कोण आहेत स्मित मच्छार?

स्मित मच्छार हे एक भारतीय पायलट आहेत, जे सध्या फ्लायदुबई नावाच्या विमान कंपनीत कॅप्टन म्हणून काम करतात. त्यांच्या विमानात १ ऑक्टोबर २०२६ रोजी एक दुर्घटना घडली. यामध्ये दुबईहून इस्रायलच्या तेलअविवला जाणाऱ्या विमानात त्यांच्या सहपायलटनं विमान हायजॅक करण्याच्या हेतून त्यांच्यावर चाकू हल्ला केल्याचं सांगिलं जात आहे. यावेळी मच्छार या हल्ल्यात गंभीररित्या जखमी झाले पण तरीही त्यांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला, आणि कॉकपिटचा दरवाजा खोलला, ज्यामुळं इतर क्रू मेंमर्बसनं हल्लेखोर पायलटला नियंत्रणात आणलं.

मच्छार यांच्या या प्रसंगावधानामुळं विमानातील १७० प्रवाशांचे प्राण वाचले, यामध्ये बहुतकरुन इस्रायली नागरीक मोठ्या प्रमाणावर होते. त्यामुळं इस्रायली नागरिकांचा जीव वाचवणाऱ्या मच्छार यांचं नेत्यानाहू यांनी ही घटना समोर आल्यानंतर आभार मानले होते. पण आता तेच नेत्यानाहू आपल्या देशाच्या स्वातंत्र्यदिनी मच्छार यांचा विशेष सन्मान करणार आहेत, विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT