Naresh Mhaske: जरांगेंनी शेअर केलेल्या 'त्या' ऑडिओ क्लीपमधील आवाज कोणाचे? खासदार नरेश मस्केंनी थेट नावंच सांगितली

Naresh Mhaske: मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषदेत ५०० कोटी रुपयांसदर्भातील ऑडिओ क्लिप सादर केल्यानं एकच खळबळ उडाली आहे. या क्लीपमध्ये ज्या लोकांचा संवाद सुरु आहे, ते लोक नेमके कोण आहेत? याची चर्चा आता सर्वसामान्यांमध्ये सुरु झाली आहे.
Naresh Mhaske_Eknath Shinde
Naresh Mhaske_Eknath Shinde
Published on: 
Updated on: 

Naresh Mhaske: मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषदेत ५०० कोटी रुपयांसदर्भातील ऑडिओ क्लिप सादर केल्यानं एकच खळबळ उडाली आहे. या क्लीपमध्ये ज्या लोकांचा संवाद सुरु आहे, ते लोक नेमके कोण आहेत? याची चर्चा आता सर्वसामान्यांमध्ये सुरु झाली आहे. दरम्यान, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी या ऑडिओ क्लीपमधील लोक कोण आहेत? त्यांची थेट नावंच घेतली आहेत.

नरेश म्हस्केंनी थेट नाव घेतली

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत नरेश म्हस्के यांनी या विषयावर सविस्तर भूमिका मांडली आहे. त्यांनी म्हटलं की, मनोज जरांगेंनी प्रकाशित केलेल्या ऑडिओ क्लीपमध्ये अशा प्रकारची वक्तव्ये करत आहेत हे ऐकायला मिळतंय, त्यामुळं मनोज जरांगेंना माझी विनंती आहे की ही ऑडिओ क्लीप तुम्ही सायबर सेलला द्यावी आणि त्याची सत्यता आपण पडतळावी. जर ही टेप सत्य असेल तर जी लोकं कोणी यात वक्तव्य करत आहेत आवाजावरुन त्यांची नाव पुढे आलेली आहेत. यात 'श्वेता शालीनी', असतील, 'निधी कामदार' असतील 'अतुल भातखळकर' असतील आणि आणखी काही सोशल मीडियातील लोक असतील त्यांचीही नावं पुढे आलेली आहेत. मला त्यांना एवढंच सांगण आहे की, अशा प्रकारे मोठेपणा मिरवण्यासाठी कुठल्या नेत्याचं जर तुम्ही नाव घेत असाल तर ते चुकीचं आहे, आपला निषेध आम्ही करतो आहोत. तसंच ज्येष्ठ नेत्यांनी यांच्यावर कारवाई करणं गरजेचं आहे.

Naresh Mhaske_Eknath Shinde
Maharashtra Politics: जरांगेंनी बाहेर आणलेल्या ऑडिओ क्लीपमुळं शिंदेसेनेची उडाली झोप! शिष्टमंडळ घेणार फडणवीसांची भेट

चहापेक्षा किटली गरम

या ऑडिओ क्लीपमध्ये महायुतीतल्या मित्रपक्षांचा काहीही विषय नाही, याच्यामध्ये कोणीही नेते नाहीत, पण नेत्यांच्या नावाखाली 'चहापेक्षा किटली गरम' असा हा प्रकार असू शकतो. त्यांनी श्रीकांत शिंदे आणि एकनाथ शिंदे यांची नावं घेतली आहेत, त्यामुळं जर ही क्लीप खरी असेल तर या लोकांवर कारवाई होणं गरजेचं आहे. मराठा समाजाविरोधात शिंदेंनी कधीही काम केलेलं नाही. मनोज जरांगेंचा कायम शिंदेंसह आम्ही सर्वांनी मान राखला आहे. पण मनोज जरांगे आणि आमच्यात भांडणं लावण्याचा जर कोणी प्रयत्न करत असेल तर तुम्ही यावर विश्वास ठेवू नका, ही क्लीप सायबर सेलला पाठवून द्या. ही क्लीप जर खरी असेल तर अशा पद्धतीन आरोप आम्हीही करु शकतो.

जरांगेंनी शिंदेंशी बोलून गैरसमज दूर करावा

मनोज जरांगेंना माझं आवाहन आहे की, आपलं एकनाथ शिंदेंशी कायम बोलणं-चालणं सुरु असतं, त्यामुळं तुम्ही थेट एकनाथ शिंदेंना एक फोन लावा आणि जो कोणी तुमच्या दोघांमध्ये गैरसमज पसरवत आहे तो दूर करा. एकनाथ शिंदेंनी कायम तुमचा मान राखला आहे तो तसाच ते पुढेही कायम ठेवतील. काल जरांगेंनी मागणी केल्याप्रमाणं एकनाथ शिंदेंनी यावर कालच स्पष्टीकरण दिलं आहे की, मी अशा पद्धतीचं मी कधीच वागलेलो नाही. काही लोक तुमच्यात आणि आमच्यात भांडणं लावण्याचा प्रयत्न करत आहेत हे मनोज जरांगे म्हणालेले आहेत. त्यामुळं आता क्लीपची सत्यता पडताळणं गरजेचं आहे.

Naresh Mhaske_Eknath Shinde
Ramdas Kadam: जरांगेंच्या 'ऑडिओ बॉम्ब'नंतर रामदास कदम भडकले! म्हणाले, क्लीप जुनी, आत्ताच कशी बाहेर आली?

मुख्यमंत्र्यांकडं केली मागणी

मुख्यमंत्र्यांना माझी एकच मागणी आहे की, आज ज्या काही क्लीप बाहेर येत आहेत त्या जर सत्य असतील तर त्याची योग्य ती चौकशी करावी आणि कारवाई करावी, अशी मागणीही यावेळी खासदार नरेश म्हस्के यांनी केली आहे.

ऑडिओ क्लीपमधील व्यक्ती कोण आहेत?

यापूर्वी शिंदेसेनेचे नेते रामदास कदम यांनी ठामपणे सांगितलं होत की, ऑडिओ क्लीपमधील लोक हे कॉन्फरन्स कॉलवर बोलत आहेत ते सर्वजण भाजपचेच लोक आहेत, हे आवाजावरुन कळतं आहे. त्याचबरोबर नरेश म्हस्के यांनी या आवाजावरुन त्यांची थेट नावचं जाहीर केली आहेत. त्यानुसार, ऑडिओ क्लीपमध्ये बोलत असलेल्या श्वेता शालिनी यांच्या फेसबूक प्रोफाईलनुसार त्या भाजपच्या प्रवक्त्या आहेत. निधी कामदार यांच्या इन्स्टाग्राम प्रोफाईलनुसार त्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसयांच्या ओएसडी आहेत तर अतुल भातखळकर हे कांदिवल पूर्वचे भाजपचे विद्यमान आमदार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com