Amanatullah Khan ED Raid Sarkarnama
देश

Amanatullah Khan ED Raid : संजय सिंहांच्या अटकेनंतर 'आप'वर नवं संकट; आमदाराच्या घरावर ईडीची छापेमारी!

Chetan Zadpe

Delhi News : आम आदमी पक्षाचे नेते व राज्यसभा खासदार संजय सिंह यांच्या अटकेनंतर आता आम आदमी पार्टीची अडचण आणखीनच वाढली आहे. आपचे आमदार अमानतुल्लाह खान यांच्या घरावर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) छापा टाकला आहे. आज मंगळवारी सकाळी (दि.१० डिसेंबर) ईडीचे पथक आमदारांच्या निवासस्थानी पोहोचले. मनी लाँड्रिंगशी संबंधित एका प्रकरणात केंद्रीय तपास यंत्रणेने हा छापा टाकला आहे. (Latest Marathi News)

अमानतुल्ला खान हे ओखला येथील आम आदमी पक्षाचे आमदार असून, त्यांच्यावर भ्रष्टाचाराच्या आरोपात त्यांच्या घरावर छापे टाकून आता त्यांची चौकशी करण्यात आली आहे. यापूर्वी अँटी करप्शन ब्युरोने अमानतुल्ला खान यांना अटक करण्यात आली होती. आता त्यांच्यावरील ईडीची कारवाई झाल्याने ते पुन्हा अडचणीत आले आहेत.

अमानतुल्ला खान हे ओखला येथील आम आदमी पक्षाचे आमदार असून, त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. एसीबीने त्यांना एका प्रकरणात अटकही केली होती. दिल्ली लाचलुचपत प्रतिबंधक ब्युरो (ACB) आणि केंद्रीय अन्वेषण ब्युरो (CBI) यांनी अमानतुल्ला खान यांच्याविरोधात दाखल केलेल्या गुन्ह्याच्या आधारे ईडीने कारवाई सुरू केली असल्याचे सांगण्यात येत आहे. हे प्रकरण दिल्ली वक्फ बोर्डातील भरती अनियमिततेशी संबंधित आहे, ज्याचे अमानतुल्ला अध्यक्ष आहेत.

मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत ईडीने अमानतुल्ला खान यांच्या ओखला येथील निवासस्थानी आणि इतर काही ठिकाणी छापे टाकले. ओखलाचे आमदार अमानतुल्ला हे अनेक वेळा वादांमुळे चर्चेत आले आहेत. गेल्या वर्षी त्यांना एसीबीने अटक केली होती. नंतर त्यांना या प्रकरणात जामीन मिळाला होता.

गेल्या आठवड्यात 'आप'चे राज्यसभा खासदार संजय सिंह यांना अटक केल्यावर अमानतुल्लाह यांच्याशी संबंधित काही ठिकाणांवर छापे टाकण्यात आले आहेत. मद्य घोटाळ्याप्रकरणी संजय सिंह यांना त्यांच्या निवासस्थानावर दिवसभर छापा टाकून अटक करण्यात आली. सिंह सध्या ईडीच्या कोठडीत आहे.

(Edited by - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT