Mumbai News : केंद्रीय निवडणूक आयोगाने राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराम या पाच राज्यांच्या निवडणुकांची घोषणा सोमवारी केली आहे. आता या निवडणुकांसाठी भाजप, काँग्रेससह प्रादेशिक पक्षांनी जोरदार तयारी केली आहे, पण आता या पाच राज्यांच्या निवडणुकाही लढवण्याची तयारी अजित पवार गटाकडून केली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्हावरील दाव्यानंतर आणखी एक आव्हान दिले असून, थेट अजित पवार गट पाच राज्यांच्या निवडणुका लढणार असल्याची माहिती समोर येत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर शरद पवार आणि अजित पवार हे दोन गट कायदेशीर लढाईसाठी आमनेसामने उभे ठाकले आहेत.अजित पवारांनी शिंदे - फडणवीस सरकारमध्ये एन्ट्री घेत सर्वांनाच राज्याच्या राजकारणात भूकंप घडवला होता. अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदासह नऊ जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली होती.
याचवेळी अजित पवारांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष(NCP) आणि चिन्हावर दावा ठोकला आहे. या दाव्यानंतर आता केंद्रीय निवडणूक आयोगासह सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. एकीकडे कायदेशीर पेच निर्माण झाला असतानाच अजित पवार गटाने थेट 5 राज्यांच्या निवडणुका लढविण्यासाठी मैदानात उतरण्याची तयारी सुरू केली आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने सोमवारी मिझोराम, छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान आणि तेलंगणा या राज्याच्या विधानसभा निवडणुकांच्या कार्यक्रमांची घोषणा केली. यात मिझोराममध्ये 7 नोव्हेंबर, छत्तीसगडमध्ये 7 आणि तेलंगणामध्ये 30 नोव्हेंबर, मध्य प्रदेशमध्ये 17 नोव्हेंबर, तर राजस्थानमध्ये 23 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. या पाचही राज्यांच्या विधानसभेची मतमोजणी 3 डिसेंबर रोजी होणार आहे.
महायुती सरकारमध्ये दाखल झालेला अजित पवार(Ajit Pawar) गट सध्या भाजपसह शिंदे गटासाठी कानामागून आला अन् तिखट झाला अशी अवस्था आहे. एकीकडे मंत्रिमंडळ विस्ताराचा दुसरा टप्पा रखडला असतानाच सत्तेत सहभागी झाल्यानंतर अजित पवारांसह नऊ जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली होती.
यानंतर काही दिवसांपूर्वीच पालकमंत्रिपदाच्या नियुक्तीतही अजित पवारांचा वरचष्मा असल्याचे दिसून आले होते. आता या मंत्रिमंडळ विस्तारात अजित पवार गटाला १ कॅबिनेट आणि दोन राज्यमंत्रिपदे तसेच केंद्र सरकारमध्येही अजित पवार गटाला एक कॅबिनेट मंत्रिपद मिळणार असल्याची माहिती समोर येत आहे.(Assembly Election)
(Edited By Deepak Kulkarni)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.