RJD ON New Parliament  Building :
RJD ON New Parliament Building :  Sarkarnama
देश

New Parliament Building : नव्या वादाला तोंड फुटलं ; संसद भवन नव्हे ही तर शवपेटी..

सरकारनामा ब्यूरो

New Parliament Inauguration Live : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज (रविवारी) नव्या संसद भवनाचे उद्घाटन (New Parliament Building Inauguration) होत आहे. जुन्या संसदेपेक्षा जास्त खासदार बसू शकतील अशा भविष्याच्या हेतूनेच ही नवी संसद तयार करण्यात आली आहे.

या नव्या संसद भवनाच्या सोहळ्यावर काही विरोधकांनी बहिष्कार टाकला आहे. राष्ट्रीय जनता दलाने संसदेच्या या नव्या इमारतीवरुन टि्वट करीत मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे.

राष्ट्रीय जनता दलाने या नवीन संसद भवनाची तुलना शवपेटी (Coffin) सोबत केली आहे. राजदच्या टि्वट हॅडलवरुन दोन फोटो पोस्ट करण्यात आले आहेत. एकीकडे शवपेटी तर दुसरीकडे नव्या संसद भवनाचा फोटो शेअर करीत तुलना केली आहे. 'हे काय आहे," असा प्रश्न राजदनं उपस्थित केला आहे.

राजदचे नेता मृत्युंजय तिवारी म्हणाले, "इतिहासाला गाडून टाकण्याचा प्रयत्न मोदी सरकार करीत आहे. इतिहासाला बदलण्याचा, संपविण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. आमचा त्याला विरोध आहे. लोकशाहीच्या या मंदिराला भाजपने आपलं कार्यालय केलं आहे,"

आम्ही जो फोटो टि्वट केला आहे, इतिहास बदलत असल्याचे ते प्रतिकात्मक रुप आहे, असे मृत्युंजय तिवारी यांनी म्हटलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi) यांच्या हस्ते नवीन संसद भवनाचं उद्घाटन करण्यात येत आहे. कार्यक्रमाच्या सुरुवातीला पुरोहितांनी वैदिक मंत्रोच्चारांमध्ये मोदींना सेंगोल (Sengol) म्हणजेच राजदंड सुपूर्द केला.

राजदंड हातात घेण्याआधी पंतप्रधान मोदींनी राजदंडाला दंडवत घातला. यानंतर त्यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यासोबत नवीन संसद भवनात राजदंडाची स्थापना केली. पंतप्रधान मोदी आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या हस्ते उद्घाटन सोहळ्याची पूजा करण्यात आली.

(Edited By : Mangesh Mahale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT