Central vista project News
Central vista project News Sarkarnama
देश

Central vista project :'सेंट्रल व्हिस्टा' तून दरवर्षी एक हजार कोटी वाचणार ; मोदी सरकारचा दावा, सविस्तर वाचा..

सरकारनामा ब्यूरो

Central vista project : राजधानी दिल्लीमध्ये नवीन संसद भवनाचे काम पूर्ण झाले असून येत्या २८ मे रोजी या नवीन संसद भवनाचे उद्धघाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. (new parliament inauguration central vista project save 1000 crores every year)

सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाअंतर्गत हे नवीन संसद भवन उभारण्यात आले आहे. त्यांचे काम गेले काही वर्ष सुरु होते. या प्रकल्पावरुन अनेक वेळा वाद निर्माण झाले. अजूनही हे वाद मिटलेले नाही. विरोधकांना या प्रकल्पावरुन मोदी सरकारवर हल्लाबोल केला होता. पण मोदी सरकारने हा प्रकल्पाचे काम जोमानं सुरुच ठेवलं.

एका अहवालानुसार या सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाचा एकूण खर्च हा २५ हजार कोटी रुपये येणार आहे. यात एक हजार कोटी रुपये नवीन संसद भवन निर्माण करण्यासाठी लागले आहेत. याविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. कोरोना काळात सुरु असलेल्या या प्रकल्पाचा कामावर विरोधकांनी टीका केली होती.

देशासाठी हा प्रकल्प किती उपयुक्त आहे, असा दावा करीत मोदी सरकारने याचे काम सुरुच ठेवले. सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पासाठी कोट्यवधी रुपये खर्च येणार आहे.

या खर्चाबाबत मोदी सरकारने स्पष्टीकरण दिले आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर दरवर्षी एक हजार कोटी रुपयांची बचत होईल, असे प्रशासनाचे म्हणणं आहे.

केंद्र सरकारचे विविध कार्यालये आहेत. ते एकाच ठिकाणी नाही. त्यासाठी त्याचे भाडे, वाहतुक व्यवस्था, कर्मचारी, अधिकारी यांच्यावर मोठ्या प्रमाणात खर्च होत आहे. सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाअंतर्गत केंद्र सरकारची सर्व कार्यालये एकाच छत्राखाली येणार आहेत.

या प्रकल्प पूर्ण झाल्यावर या ठिकाणी ५१ मंत्रालयांचे कार्यालये दहा इमारतीमध्ये असतील. त्यामुळे एक हजार कोटी रुपयांची बचत होणार आहे. त्याशिवाय सगळ्यांची सुरक्षा एका ठिकाणी होणार असल्याचे खर्च वाचणार असल्याचे केंद्र सरकारचे म्हणणं आहे.

सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पासाठी लागणारा कोट्यवधींचा खर्च लक्षात घेऊन केंद्र सरकार अर्थसंकल्पातील विविध योजनांच्या निधीमध्ये कपात केली, असा आरोप विरोधकांनी केला आहे.

नवीन संसद भवना उद्धघाटन सोहळ्यात तमिळनाडू येथून आणलेल्या 'सेंगोल'(sengol) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राजदंडाविषयी सध्या चर्चा आहे. या राजदंडाविषयी अनेकांच्या मनात कुतूहल निर्माण झाले आहे.

ऐतिहासिक राजदंड (सेंगोल) लोकसभाध्यक्षांच्या आसनाशेजारी स्थापित केला जाणार आहे. 'थिरुवादुथुराई अथिनाम’ मठाचे मुख्य पुजारी श्री हरिहर देसिका स्वामीगल हे पंतप्रधान नरेंद्र मोदींना हा राजदंड सोपविणार आहे.

(Edited By : Mangesh Mahale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT