Rahul Gandhi : मोठी बातमी : खासदारकी रद्द झाल्यानंतर राहुल गांधींना मोठा दिलासा ; तीन वर्षांसाठी न्यायालयाने..

Rahul Gandhi Passport Case : सुब्रमण्यम स्वामी यांनी राहुल गांधी यांच्या अर्जाला विरोध केला.
Rahul Gandhi
Rahul GandhiSarkarnama
Published on
Updated on

Rahul Gandhi Passport Case : 'मोदी' आडनावामुळे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची खासदारकी न्यायालयाने रद्द केली. त्यानंतर राहुल गांधी यांना एका प्रकरणात दिलासा मिळाला आहे. (rahul gandhi passport issue permission to make a new passport noc given for 3 years)

खासदारकी गेल्यानंतर राहुल गांधी यांनी आपला राजकीय कारणासाठी असलेला पासपोर्ट जमा केला होता. नवा पासपोर्ट मिळाला, यासाठी त्यांनी न्यायालयाकडे अर्ज केला होता. त्यावर दिल्लीच्या न्यायालयाने त्यांना नवीन पासपोर्ट देण्याची परवानगी दिली आहे, याबाबतचा आदेश न्यायालयाने दिला आहे.

हा पासपोर्ट तीन वर्षांसाठी असेल, असे न्यायालयानं म्हटलं आहे. दहा वर्षासाठी पासपोर्ट मिळाला अशी मागणी राहुल गांधींनी न्यायालयाकडे केली होती.

राज्यसभेचे माजी खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी राहुल गांधी यांच्या अर्जाला विरोध केला. दहा वर्षांसाठी पासपोर्ट देणे कुठल्याही कारणासाठी योग्य नसल्याने सुब्रमण्यम यांनी म्हटले होते.

Rahul Gandhi
Sengol : राजदंड सोपवणाऱ्या पुजाऱ्याचे मोदींविषयी मोठं विधान ; म्हणाले, ते पुन्हा पंतप्रधान..

राहुल गांधी हे नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात आरोपी आहेत. त्यामुळे त्यांना फक्त एका वर्षासाठी पासपोर्ट देण्यात यावा, असे सुब्रमण्यम स्वामी यांनी न्यायालयात सांगितले. त्याला राहुल गांधी यांच्या वकिलाने विरोध केला. या प्रकरणात सुब्रमण्यम स्वामी यांना २६ मे पर्यंत बाजू मांडण्यास सांगितले होते. त्यानंतर यावर आज सुनावणी झाली.

Rahul Gandhi
Nine Years Of Modi Govt : 'खोट्या आश्वासनांची नऊ वर्ष पूर्ण ; काँग्रेसचा भाजपवर घणाघात..

राहुल गांधी यांनी 2019 मध्ये कर्नाटक निवडणुकीदरम्यान एका रॅलीत भाषण देताना एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. या रॅलीत बोलताना त्यांनी 'सर्व चोरांचं आडनाव मोदी का असतं?' असं प्रश्न केला होता. 5 वर्षानंतर निकाल देताना सूरत सेशल कोर्टाने राहुल गांधी यांनी 2 वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर आता त्यांची खासदारकी रद्द झाली आहे.

(Edited By : Mangesh Mahale)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com