CP Radhakrishnan Vice President : महाराष्ट्राचे राज्यपाल तथा राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सी. पी. राधाकृष्णन यांची देशाचे 14वे उपराष्ट्रपती म्हणून निवड झाली आहे. देशाच्या उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विरोधक इंडिया आघाडी आणि सत्ताधारी एनडीएमध्ये चांगली चुरस पाहायला मिळाली.
या निवडणुकीत महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे मतं फुटल्याची दावा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी केला. खासदार शिंदेंच्या या दाव्याचा समाचार घेतलाच, याशिवाय निवडणुकीत सत्ताधाऱ्यांच्या सत्तेची दहशत दिसल्याचा घणाघात करताना, नवीन उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांच्यावर आता मावळते उपराष्ट्रपती जगदीप धनखड कुठे आहेत, याचा शोध घेण्याची जबाबदारी देत असल्याचे खासदार संजय राऊत यांनी केला.
उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीत इंडिया आघाडीत एकजूट राहण्यात अपयशी ठरल्याचे सांगितले जात आहेत. यावर संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, "असे काही झालेलं नाही. इंडिया आघाडी एकसंघ होती. उलट एनडीएमध्ये अस्वस्थता होती. आमची 15 मते निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अवैध ठरवली. निवडणूक निर्णय अधिकारी कोण असतो, हे तुम्हाला माहिती आहे, असे सांगून ही मते अवैध ठरवण्याच्या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला. "
तरी देखील दहा ते 12 मतं क्राॅसिंग झाली, यावर बोलताना, खासदार राऊत म्हणाले, "आम्ही इंडिया आघाडीने 300चा आकडा गाठला हेच सर्वात मोठं आहे. जी मतं क्रॉस झाली, ती महाराष्ट्रातील महाविकास आघाडीची (MVA) नाही, असा दावा केला. पण सत्ताधाऱ्यांच्या सत्तेची दहशत होती. यामुळे बिजू जनता दल, जनता दल, केसीआर हे पक्ष निवडणुकीपासून तटस्थ राहिले."
मात्र नवीन उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांच्यावर आम्ही एक मोठी जबाबदारी देत असल्याचे सांगत, नवीन उपराष्ट्रपतींनी मावळते उपराष्ट्रपाती जगदीप धनखड कुठे आहेत, याचा शोध घ्यावा. इतके दिवस त्यांना कुठे डांबून ठेवलं होतं, याची माहिती घ्यावी. जगदीप धनखड जोपर्यंत सार्वजनिक जीवनात दिसत नाहीत, तोपर्यंत आम्ही गायब आहे, असे समजतो, असा टोला खासदार संजय राऊत यांनी लगावला.
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे मतं फुटल्याची अप्रत्यक्षपणे दावा केला आहे. त्यावर खासदार संजय राऊत यांनी, महाराष्ट्रातील मविआ अजितबात फुटलेली नाहीत. स्वतः विकले गेले, शरण गेले, गुलामी पत्कारली, हे त्यांनी अगोदर लक्षात घेतलं पाहिजे. निष्ठा हा शब्द काय आहे ज्यांना माहिती नाही, त्यांनी निष्ठावानांचा वारंवार अपमान करत आहेत, असा घणाघात केला.
15 जी अवैध मतं काढली, तर ती देखील सेवानिवृत्त न्यायमूर्ती सुदर्शन रेड्डी यांना पडलेली आहेत, असा दावा करताना, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवर संजय राऊत यांनी निशाणा साधला. हे रोज तोंडावर पडत आहेत. मराठा आणि ओबीसी आरक्षणाबाबत देखील हे तोंडावर पडले आहेत. प्रत्येक निर्णयात हे सरकार अपयशी ठरताना दिसत आहेत. आता फक्त कॅबिनेटमध्ये गँगवाॅर होणे बाकी आहे. ठाणे, नवी मुंबईत गँगवाॅर होणार आहे. भाजपचे मंत्री गणेश नाईक यांनी क्रांतीची मशाल घेतली आहे, असा टोला देखील संजय राऊत यांनी लगावला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.