Narendra Modi Sarkarnama
देश

Modi Government : नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी मोदी सरकारकडून शेतकऱ्यांना ‘गिफ्ट’; खतांच्या किंमतींबाबत मोठा निर्णय

Cabinet Meeting DAP Rates New year Gift Farmers : नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत शेतकऱ्यांसाठी महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत.

Rajanand More

New Delhi : मोदी सरकारने नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी देशातील शेतकऱ्यांना खूशखबर दिली आहे. बुधवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांसाठी महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. DAP या खताच्या किंमती स्थिर राहण्यासाठी सरकारने अनुदानात भरघोस वाढ केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना या खताची 50 किलोची बॅग 1350 रुपयांनाच मिळणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत डीएपी खतावर अतिरिक्त 3 हजार 850 रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात खताच्या वाढत्या किंमतीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने हा निर्णय घेतल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. भारतात डीएपी खताचा मोठ्या प्रमाणात वापर केला होता.

केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बुधवारी सरकारच्या या निर्णयाची माहिती दिली. ते म्हणाले, आजची कॅबिनेट बैठक शेतकऱ्यांना समर्पित होती. शेतकऱ्यांना योग्य किंमतीमध्ये डीएपी उपलब्ध होईल, यासाठी 1 जानेवारी 2024 ते 31 डिसेंबर 2025 या कालावधीत डीएपीसाठी विशेष पॅकेजला मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पुढील वर्षभर या खताचा एक बॅग 1,350 रुपयांनाच मिळत राहील.

कॅबिनेटच्या बैठकीत शेतकरी हितासाठी व्यापक चर्चा करण्यात आली. आजचे सर्व निर्णय शेतकरी हिताशी संबंधित आहेत. आजच्या बैठकीत सर्वात मोठा निर्णय म्हणजे, पीएम पीक विमा योजनेसाठीच्या निधीमध्ये वाढ करण्याचा आहे. या योजनेसह हवामान आधारित पीक विमा योजनेची तरतूद वाढवून 69 हजार 515 कोटी करण्यात आला आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांच्या जीवनात होत असलेल्या बदलांमुळे ही तरतूद वाढवण्यात आल्याचे वैष्णव यांनी सांगितले.

पीक विमा योजनेचे मुल्यांकन, दावे वेगाने निकाली काढणे आदी कारणांसाठी 800 कोटींचा कोष तयार करण्यात आला आहे. या योजनेची व्याप्ती आणि अर्ज वाढवण्यासाठी ही प्रक्रिया संपूर्णपणे डिजिटल करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती वैष्णव यांनी दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT